Eyes and Life Connection : डोळे सांगतात, तुम्ही अजून किती वर्षे जगणार

eye health longevity signs how your eyes may predict life expectancy
Eyes and Life Connection : डोळे सांगतात, तुम्ही अजून किती वर्षे जगणार
Published on
Updated on

शास्त्रज्ञांनी डोळ्यांचे स्कॅनिंग करून भविष्यातील अल्झा‍यमर्सबाबत निदान करता येते, असा दावा केला होता.

आता व्यक्तीचे उर्वरित जीवन किती बाकी आहे हे त्याच्या डोळ्याच्या साहाय्याने आपल्याला कळू शकते, असा दावा ऑस्‍ट्रेलियातील मेलबर्न्‍स सेंटर फॉर आय रिसर्च संशोधकांनी केला आहे.

त्यांनी नुकतेच याबाबत संशोधन केले आहे.

या संशोधकांचे म्हणणे आहे की, डोळ्यांमध्ये असणारा रेटिना हा मानवाच्या आरोग्याचा आरसा असतो आणि म्हणूनच डोळे स्कॅन करून सांगितले जाऊ शकते की, एखाद्या मनुष्याचे उर्वरित जीवन किती शिल्लक राहिलेले आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, व्यक्ती आणि रेटिना यांच्या वयाच्या अंतरानुसार संबंधित व्यक्ती भविष्यात किती वर्षे जिवंत राहणार आहे, याबद्दल कळते.

‘डेलीमेल’च्या रिपोर्टनुसार, मेलबर्न्‍स सेंटर फॉर आय रिसर्च यांनी विशेष आर्टिफिशियल इंटेलिजन्स‍ एल्‍गोरिदिम तयार करून त्याच्या माध्यमातून डोळ्यांच्या रेटिनाचे १९ हजार फोटो घेण्यात आले आणि या सर्वांचे विश्लेषण केले.

याशिवाय, यूकेच्या बायोबँकमध्ये ३६ हजार लोकांच्या रेटिनामधील वयातील गॅप समजून घेण्यात आला.

शास्त्रज्ञ डॉ. लीजा झू सांगतात की, संशोधनाअंती एक गोष्ट समोर आली की, रेटिना आपल्या वाढत्या वयाचे इंडिकेटर देतो. त्यावरूनच त्याच्या मृत्यूबाबत अंदाज बांधता येणे शक्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news