

आपण दररोज पंख्याचा वापर करतो; मात्र त्याची स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष केले जाते
कालांतराने पंख्याच्या पात्यांवर मोठ्या प्रमाणात धूळ, माती, परागकण आणि कधीकधी तेलकट डागही जमा होतात
पंखा सुरू केल्यानंतर त्यावरील धूळ हवेत पसरून अॅलर्जीचा त्रास असलेल्या व्यक्तींना आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात
छताचा पंखा स्वच्छ करणे हे घरातील एक साधे काम वाटू शकते. मात्र, त्याचा घरातील वातावरण आणि कुटुंबाच्या आरोग्यावर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो
छताचा पंखा स्वच्छ करण्यासाठी उशीच्या जुन्या कव्हरचा वापर करणे ही एक सोपी पद्धत आहे. प्रत्येक पात्यावर उशीचे कव्हर चढवा आणि हलका दाब देत ते बाहेरच्या दिशेने सरकवा
पात्यांवरील धूळ थेट खाली न पडता कव्हरमध्ये जमा होते. त्यामुळे धूळ खोलीत पसरण्याचा त्रास कमी होतो आणि स्वच्छतेचे कामही सोपे होते
धूळ काढल्यानंतर पंख्याची पाती ओल्या कापडाने पुसून घेतल्याने उशीच्या कव्हरने न निघालेले तेलकट डाग आणि चिकट घाण काढण्यास मदत होते
पंख्याच्या पृष्ठभागावरील कोटिंग खराब होऊ शकते, त्यामुळे सौम्य स्वच्छता द्रावणाचा वापर करून पाती स्वच्छ करता येतात
पंख्याचे सर्व स्क्रू व्यवस्थित घट्ट आहेत का आणि पाती योग्य स्थितीत आहेत का, याची तपासणी करा. आवश्यक असल्यास तज्ज्ञांकडून दुरुस्ती करून घ्या