Dairy Farming | दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी बंदिस्त की मुक्त गोठा?

Dairy Farming
Dairy Farming
Published on: 
Updated on: 

दुग्धव्यवसायात गायी किंवा म्हशींचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी गोठ्याची रचना, हवामान, सुविधा, चारा व्यवस्थापन याचा विचार करावा लागतो

जनावरांना मिळणारी मोकळीक, आहार, पाणी, स्वच्छता, उष्णतेपासून संरक्षण आणि आजारांचे नियंत्रण या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत

पुरेशी सावली, चांगला निचरा, स्वच्छ पाणी आणि संतुलित आहाराची व्यवस्था असलेला मुक्त गोठा हा अनेक व्यावसायिक दुग्धफार्मसाठी फायदेशीर ठरला आहे

उंच छप्पर, मोकळ्या बाजू, हवा खेळती राहण्याची व्यवस्था, पंखे आणि आवश्यकतेनुसार पाण्याचे फवारे यामुळे उष्णतेचा ताण कमी करता येतो

जनावरांना आरामात बसता आणि उठता येणे महत्त्वाचे आहे. पुरेशी कोरडी जागा मिळाल्यास त्यांना विश्रांती घेता येते आणि रवंथासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते

स्वच्छ पाणी सतत उपलब्ध असणे आणि सर्व जनावरांना एकाच वेळी पुरेसा चारा मिळणे गरजेचे आहे. गर्दी किंवा खाद्यासाठी स्पर्धा असल्यास काही जनावरांचे सेवन कमी होऊ शकते

मोकळीक मिळाल्याने जनावरांना नैसर्गिक हालचाल करता येते. मात्र, खुरांचे आरोग्य, उष्णतेची लक्षणे, आजार आणि प्रजनन यांचे नियमित तपासणी आवश्यक

जनावरांना सतत बांधून ठेवल्यास हालचाल कमी होते. त्यामुळे बांधण्याची जागा आरामदायी असावी, जनावराला सहज उठता-बसता आले पाहिजे आणि योग्य व्यायाम व स्वच्छतेची व्यवस्था महत्त्वाची असते

NDDB च्या निकषांनुसार मुक्त गोठ्यासाठी १६० चौ. फूट जागा, त्यापैकी ४० चौ. फूट आच्छादित जागा, तसेच खाद्य गव्हाणीसाठी सुमारे २ फूट जागा गरजेची आहे

logo
Pudhari News
pudhari.news