Chapati & weight loss : चपाती बंद केल्यास वजन कमी होते का? संशोधन काय सांगते!

Chapati & weight loss : चपाती बंद केल्यास वजन कमी होते का? संशोधन काय सांगते!

Published on: 
Updated on: 

चपाती हा आपल्या आहारातील प्रमुख घटक पण काही आहारतज्ञ चपाती खाणे सोडल्यास वजन कमी होण्यास मदत होते असा दावा करतात पण यापाठीमागे काय तथ्य आहे हे पाहू

चपाती (गव्हाची पोळी) खाणे बंद केल्यास वजन कमी होऊ शकते, पण चपाती पूर्णपणे बंद करणे हा वजन कमी करण्याचा एकमेव किंवा कायमस्वरूपी उपाय नाही.

कॅलरी इनटेक कमी होणे : एका मध्यम आकाराच्या चपातीत सुमारे ८० ते ११० कॅलरीज असतात. दिवसातून ४ चपात्या खाणाऱ्या व्यक्तीने त्या पूर्ण बंद केल्यास दररोज ३५०–४५० कॅलरीज कमी होतात. कॅलरी कमी झाल्यामुळे वजन घटते.

चपातीमधून शरीराला कर्बोदके मिळतात. शरीर १ ग्रॅम ग्लायकोजेन साठवण्यासाठी सुमारे ३ ग्रॅम पाणी धरून ठेवते. कार्ब्ज बंद करताच शरीरातील पाण्याचे वजन वेगाने कमी होते, ज्यामुळे सुरुवातीला वजन पटकन कमी झाल्यासारखे वाटते.

कमी इन्सुलिन स्पाइक: साध्या पिठाच्या पोळ्या किंवा मैद्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढू शकते; कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण नियंत्रित केल्यास इन्सुलिनची पातळी स्थिर राहून फॅट बर्निंगला मदत होते.

हार्वर्ड विद्यापीठाच्या दीर्घकालीन अभ्यासांनुसार, अखंड गव्हाचे (Whole Wheat) प्रमाण नियंत्रित ठेवून खाल्ल्यास वजन वाढत नाही.

याउलट, प्रक्रिया केलेले बारीक पीठ किंवा पांढरा ब्रेड वजन वाढवतो. चपाती गव्हाच्या संपूर्ण पिठाची (कोंड्यासह) असल्यास ती फायबर पुरवते.

लो-कार्ब डाएट स्टडीज - जेव्हा आहारात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी केले जाते (उदा. चपाती, भात, साखर कमी करणे), तेव्हा पहिल्या ६ महिन्यांत वेगाने वजन घटते. पण १ ते २ वर्षानंतर वजन कमी होणे थांबते

ICMR भारतीय आहारातील ७०–८०% वाटा फक्त कार्बोहायड्रेट्सचा असतो. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आहारात कार्बोहायड्रेट्स ५०–५५% पर्यंत मर्यादित करून प्रथिनांचे आणि फायबरचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे.

चपाती पूर्णपणे बंद करण्याचे काही तोटे आहेत : शरीराची मुख्य ऊर्जा कर्बोदकांमधून येते; ती अचानक पूर्ण बंद केल्यास चक्कर येणे किंवा ऊर्जा कमी जाणवू शकते.

वजन कमी करायचे असेल तर चपाती पूर्ण बंद करण्याऐवजी प्रमाण नियंत्रित करणे अधिक फायदेशीर ठरते: यासाठी जेवणात चपातीची संख्या कमी करा (उदा. ३ ऐवजी १ किंवा २ चपाती).

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news