Panchakarma | शरीराला डिटॉक्स करणारे आयुर्वेदातील 'पंचकर्म' नक्की काय आहे?
आधुनिक स्मार्ट जगात शरिराला फिट ठेवणे खूप महत्वाचे आहे, शारिरीक व्याधींनी शरिरात प्रवेश केला असेल तर आरोग्याच्या कुरबुरी सुरु असतात
यासाठी भारतीय प्राचिन आर्युवेदीक उपचारपद्धती असलेली पंचकर्म खूप उपयुक्त ठरते, 'पंचकर्म' ही शरीरातील विषारी घटक (टॉक्सिन्स) बाहेर काढणारी त्रिदोषांचे (वात, पित्त, कफ) संतुलन राखणारी उपचार पद्धती आहे
पंचकर्माचा सर्वात पहिला आणि प्राथमिक उल्लेख ऋग्वेदात आणि विशेषतः अथर्ववेदात आढळतो. याचा इतिहास ५००० वर्षे जुना मानला जातो
महर्षी चरक, महर्षी सुश्रुत, महर्षी वाग्भट या ॠषीमुनींनी ही पंचकर्म ही पद्धतीत सुधारणा करत पंचकर्म सर्वसामान्य वैद्यांसाठी अधिक सोपे व पद्धतशीर बनवले.
वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण यामध्ये, औषध पोटात देऊन उलट्या करणे, तसेच औषधांनी जुलाब करुन आणने, मालिश, पोटात मलमार्गे औषध सोडणे, नाकात औषध सोडणे इत्यादी प्रकारे उपचार केले जातात
पंचकर्माचे फायदे, शरीराचे संपूर्ण डिटॉक्सिफिकेशन: शरीरातील साचलेले विषारी घटक (टॉक्सिन्स किंवा 'आम') मुळापासून बाहेर टाकले जातात.
दोष संतुलन: वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचे संतुलन साधून आजारांची शक्यता कमी होते. मंदावलेली पचनक्रिया (अग्नि) सुधारून अन्न पचनाची क्षमता वाढते.
रोगप्रतिकारशक्ती वाढणे: शरीराची नैसर्गिक आजार प्रतिकार क्षमता बळकट होते. शरीरातील अतिरिक्त चरबी, पाण्याचा साठा आणि अनावश्यक मेद कमी होण्यास मदत होते.
रक्तातील अशुद्धी दूर झाल्याने त्वचा निरोगी, तुकतुकीत आणि चमकदार बनते. तणावमुक्ती आणि शांत झोप: मानसिक तणाव, चिंता कमी होऊन मन शांत होते आणि गाढ झोप लागते.
दीर्घकालीन आजारांपासून आराम: सांधेदुखी, बद्धकोष्ठता, मायग्रेन आणि ॲलर्जी यांसारख्या जुनाट विकारांवर प्रभावी आराम मिळतो.

