एक काळ होता जेव्हा ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्यातील प्रेमसंबंधातील चर्चा रंगत होत्या पण अचानकपणे या दोघांचे वेगवेगळे मार्ग झाले.

सलमान खान सोबत नात्यात दुरावा आल्यानंतर ऐश्वर्याने त्याच्यासोबत काम करणे बंद केले होते. तसेच तिने सलमान आणि ब्रेकअपविषयी एकही शब्द काढलेला नव्हता.

अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांनी एका कार्यक्रमात ऐश्वर्याला सलमानविषयी काही प्रश्न विचारले. ब्रेकअप विषयी काहीच बोलत नाहीस, असं का ? असा हा प्रश्न होता.

यावर ऐश्वर्याने खूप शांतपणे उत्तर दिले. ती म्हणाली की, सलमान हा विषय तिच्या आयुष्यातून संपलेला आहे. आता ती मागे वळून पाहणार नाही. विशेषत: सार्वजनिक ठिकाणी तर नाहीच. जी गोष्ट भूतकाळात आहे, तिला तिथेच सोडून दिले पाहिजे.

ऐश्वर्याच्या म्हणण्यानुसार, ती आपल्या आयुष्यातील काही गोष्टींविषयी सार्वजनिक ठिकाणी बोलत नाही कारण, ती एकटी स्वत:बाबत विचार करत असते. तिच्या सोबत तिचे कुटुंबिय आणि तिच्या जवळचे लोक आहेत.

ऐश्वर्या असं देखील म्हणते की, आपल्या आयुष्याच्या काही बाजू मी नाकारते. ती प्रसिद्ध असली तरी सामान्य व्यक्ती आहे. आणि ज्या व्यक्तीबाबत ती बोलणार त्यालाही कुटुंब आहे. त्यामुळे का यावर बोलायचं.

ऐश्वर्या राय आपल्या आयुष्यात खूप पुढे निघून गेलेली आहे. तिने अभिषेक बच्चन सोबत लग्न केले. दोघांना आता मुलगी आहे. ऐश्वर्या आपल्या आयुष्यात खुश आहे.