अभिनेत्री संस्कृती बालगुडेने मराठी चित्रपट आणि मालिकेतून चाहत्यांची मने जिंकली आहेत.

संस्कृतीचा आगामी 'चौक' चित्रपट २ जून २०२३ रोजी चाहत्यांच्या भेटीस येत आहे.

कलरफूल ब्लॅक रंगाच्या ऑफ शोल्डर चोलीसोबत लेंहगा तिने परिधान केलाय.

संस्कृतीच्या ड्रेसवरील डिझाईन, ओढणी आणि फोटोशूटच्या मागील बॅकग्राऊंडने चारचाँद लावलेत.

'Dramatic, ain’t it ?… ♠️', '…I’d rather remain a mystery..♠️'. या फोटोला तिने कॅप्शन लिहिली आहे.

मोकळ्या केसांची स्टाईल, हातात ब्रेसलेट, रेड लिपस्टिक आणि मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केलाय.   

 फोटोंत संस्कृती मनमोहक आणि ग्लॅमरस दिसली.

सांगते ऐका, निवडुंग, फु फ्रेंडशिप अनलिमिटेड, भय, लग्न मुबारक या चित्रपटात अभिनयाचा ठसा उमठवलाय.