

अंडी : केवळ प्रोटीन नाही, तर मेंदूचे 'सुपरफूड'!
अंडी फक्त स्नायूंच्या मजबुतीसाठी नसून मेंदूला तल्लख ठेवण्यासाठीही अत्यंत प्रभावी ठरतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
हार्वर्डच्या डॉक्टरांचा खास सल्ला
हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे शिक्षण घेतलेले प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी अंड्यांना मेंदूच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम मानले आहे.
'कोलीन' नावाचा जादूई घटक
अंड्यांमध्ये 'कोलीन'नावाचा अत्यंत महत्त्वाचा पोषक घटक असतो, जो मेंदूच्या पेशींना ऊर्जा देण्याचे काम करतो.
मेंदूतील सिग्नल्सचा वाढतो वेग
कोलीनमुळे मेंदूमध्ये 'एसिटाईलकोलीन' तयार होते. हे रसायन मेंदूतील संदेशांचा (Signals) वेग वाढवते, ज्यामुळे तुम्ही अधिक सक्रिय राहता.
स्मरणशक्ती होते अधिक मजबूत
जर तुम्हाला गोष्टी विसरण्याची सवय असेल, तर नियमित अंडी खाल्ल्याने माहिती साठवण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता सुधारते.
वाढते एकाग्रता
अभ्यास असो किंवा ऑफिसचे काम, अंड्यांच्या सेवनामुळे कामावर दीर्घकाळ लक्ष केंद्रित करणे सोपे जाते.
बुद्धिमत्तेला मिळते नवी धार
केवळ शरीरासाठीच नव्हे, तर मेंदूला तल्लख आणि 'शार्प' ठेवण्यासाठी अंडी हा सर्वात स्वस्त आणि मस्त पर्याय आहे.
आजच करा आहारात समावेश
तुमच्या रोजच्या नाश्त्यात एका अंड्याचा समावेश केल्यास शारीरिक शक्तीसोबतच मानसिक कार्यक्षमताही कित्येक पटीने वाढू शकते.