हिमनदी वितळली आणि सापडले विमान!

हिमनदी वितळली आणि सापडले विमान!
Published on
Updated on

लंडन ः यंदा युरोपमध्ये 'न भुतो' असा उन्हाळा होता व तापमानाने चाळीशीही पार केली होती. इतक्या तापमानामुळे अनेक ठिकाणचे ग्लेशियर्स म्हणजेच हिमनद्याही वितळून गेल्या. त्यामुळे अनेक वर्षे त्यांनी आपल्या पोटात ठेवलेली अनेक गुपितेही उघड झाली.आल्प्सच्या पर्वतराजीतील हिमनद्या वाढलेल्या तापमानाने वितळल्यावर आता चक्क एक विमानही सापडले असून एका व्यक्तीच्या मृतदेहाचा सांगाडाही आढळला आहे.

सन 1968 च्या जून महिन्यात जंगफ्राऊ आणि मोंच पर्वतशिखरांजवळ एल्तेश ग्लेशियररच्या परिसरात हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात एका गिर्यारोहण मार्गदर्शकाने या विमानाचा शोध लावला. वितळलेल्या ग्लेशियरमुळे 54 वर्षांपूर्वीचे हे रहस्य उघड झाले. मानवी हाडांसह विमानाचाही सांगाडा तिथे आढळून आला. गेल्या बुधवारी दोन फे्ंरच गिर्यारोहकांनाही वॅलेसच्या दक्षिण कँटनमध्ये चेसजेन ग्लेशियरची मोजणी करीत असताना मानवी हाडे आढळली. या मानवी सांगाड्याला त्याचदिवशी ग्लेशियरमधून एअरलिफ्ट करण्यात आले. ही हाडे एका जुन्या रस्त्याजवळ सापडल्याचे बि—टिश गिर्यारोहण संस्थेने म्हटले आहे. या व्यक्तीचा मृत्यू 1970 किंवा 80 च्या दशकात झाल्याचा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news