Robot rat : शास्ञज्ञांनी तयार केलेला रोबोट उंदीर पाहीला का?

Robot rat : शास्ञज्ञांनी तयार केलेला रोबोट उंदीर पाहीला का?
Published on
Updated on

बीजिंग : अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पूर्वी मानवासारखे दिसणारे रोबो तयार करण्यात येत असत. मात्र, गेल्या काही वर्षांत प्राण्यांचे रोबो तयार करण्यात येऊ लागले. यामध्ये रोबोट मासा, रोबोट कुत्रा यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. मात्र, आता चिनी शास्त्रज्ञांनी चक्क 'रोबोट उंदीर' विकसित केला आहे. बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी हा रोबोट उंदीर तयार केला आहे.

चार पायांच्या रोबोट उंदराचे नाव डर्टीठे असे आहे. तो वाकू, चालू, सरपटू, उभा आणि हव्या त्या दिशेला वळू शकतो. याशिवाय आपल्या वजनापेक्षा 91 टक्के अधिक वजन तो उचलू शकतो. या उंदराच्या मदतीने अत्यंत अडचणीच्या ठिकाणी बचाव मोहीम राबविणे सोपे होणार आहे.

रोबोट उंदीर हा खराखुरा उंदीर नजरेसमोर ठेवून त्याच्यासारखाच बनविण्याचा प्रयत्न केला. रोबोट उंदराची पाठही खर्‍या उंदरासारखी लवचिक आहे. सध्या या रोबोट उंदराचे काम पूर्ण झाले आहे. चाचणीदरम्यान या उंदराने साडेतीन इंच उंच असलेली बाधाही पार केली. याशिवाय तो 15 अंशाच्या चढतीवरही आरामात चढू शकतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news