शनीच्या चंद्रावर गुप्त महासागर

शनीच्या चंद्रावर गुप्त महासागर

स्टॉकहोम : आपल्या सूर्यमालेतील दुसरा मोठा ग्रह असलेल्या 'शनी' या ग्रहाच्या चंद्रावर सुमारे 32 कि.मी. जाड बर्फाचा थर आहे, असा दावा करण्यात येत आहे. या चंद्राचे नाव आहे 'मीमास'. या चंद्रावर असलेल्या बर्फाच्या जाड थराखाली एक गुप्त महासागर असल्याचेही म्हटले जात आहे.

'शनी' या ग्रहाला असलेल्या अनेक चंद्रांपैकी 'मीमास' हा एक. त्याचा व्यास सुमारे 395 कि.मी. इतका आहे. हा एक खगोलीय पिंड असून, आपल्या शक्तिशाली गुरुत्वाकर्षणामुळे तो आकाराने सर्वाधिक गोल बनला आहे.

यापूर्वी विशेषज्ञांनी दिलेली माहिती, छायाचित्रे व निरीक्षणातून 'मीमास'वर तरल रूपात पाणी असल्याचे कोणतेच संकेत मिळालेले नव्हते. मात्र, कोलारॅडोमधील साऊथ-वेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने करण्यात आलेल्या संशोधनातील निष्कर्षानुसार 'मीमास'वरील बर्फाच्या जाड थराखाली एक महासागर लपला आहे. 2014 मध्ये नासाच्या 'कॅसिनो' नामक यानाने पुरविलेल्या माहितीनुसार, 'मीमास' या चंद्राच्या जमिनीखाली पाणी असू शकते. मात्र, अद्याप याची पुष्टी करण्यात आलेली नाही.

नव्या संशोधनात शास्त्रज्ञांच्या एका पथकाने शनीच्या 'मीमास' या चंद्राचा आकार, त्याची संरचना याबाबत माहिती मिळविली. या माहितीनुसार, 'मीमास'ची आंतरिक भागात असलेली उष्णता ही पाण्याची स्थिती कायम राखण्यास सक्षम आहे. शनीच्या या चंद्राला 'सॅटर्न ळ' असेही म्हटले जाते. 'मीमास'चे एकूण क्षेत्रफळ हे स्पेनच्या भूभागाच्या क्षेत्राइतके आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news