वेळेपूर्वीच फुलताहेत क्योटोतील चेरी ब्लॉसम

वेळेपूर्वीच फुलताहेत क्योटोतील चेरी ब्लॉसम www.pudharinews.
वेळेपूर्वीच फुलताहेत क्योटोतील चेरी ब्लॉसम www.pudharinews.

टोकिओ : जपानमधील क्योटो हे शहर चेरी ब्लॉसमसाठी जगातच प्रसिद्ध आहे. या शहरात प्रत्येकवर्षी एप्रिल व मेच्या मध्याला पूर्णपणे फुललेली चेरी ब्लॉसम पाहण्यासाठी जगभरातील लोक क्योटोत गर्दी करतात. मात्र, जलवायू परिवर्तनाचा चेरी ब्लॉसमवरही परिणाम होत आहे. जपानमध्ये निर्धारित वेळेपूर्वीच वसंत ऋतूस सुरुवात होत आहे. आयओपी जर्नल एन्व्हायर्न्मेर्ंट रिसर्च लेटर्समध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनानुसार जलवायू परिवर्तनामुळे क्योटोतील चेरी ब्लॉसम आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 11 दिवस अगोदरच फुलत आहेत.

संशोधनाचे प्रमुख लेखक आणि जलवायू शास्त्रज्ञ निकोस क्रिस्टिडिस यांच्या मते, जलवायू परिवर्तनामुळे मानव जात तर प्रभावित होतच आहे. याबरोबरच अर्बन वॉर्मिंगमुळे क्योटोमधील चेरी ब्लॉसम फुलण्याच्या तारखांही प्रभावित होत आहेत. गेल्यावर्षी 26 मार्च रोजीच चेरी ब्लॉसम फुलले होते. गेल्या एक हजार वर्षांत प्रथमच असे झाले आहे. मात्र, यंदा ही झाडे एक एप्रिल रोजीच फुलली.

निकोस क्रिस्टिडिस यांनी यासंदर्भात सांगितले की, वसंत ऋतूच्या आगमनाचे संकेत देणार्‍या या फुलांच्या फुलण्यामागे एक ठोस विज्ञान आहे. चेरी ब्लासम हे फुलण्याइतपत अनेक दिवस जोपर्यंत उष्ण वातावरण तयार होत नाही, तोपर्यंत ही झाडे फुलत नाहीत. क्योटोमध्ये असे पूरक वातावरण मार्चपासूनच सुरू होते. जेव्हा पारा सातत्याने अनेक दिवस 9 ते 10 अंश सेल्सियस यादरम्यान कायम असतो, तेव्हा चेरी ब्लॉसम फुलण्यास सुरुवात होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news