नवी दिल्ली : विंचू हा पृथ्वीतलावरील सर्वात प्राचीन जीव आहे. जीवाश्मातून असे स्पष्ट होते की, विंचू हा डायनासोरपेक्षाही प्राचीन जीव आहे. विंचवाबाबतच्या अनेक आश्चर्यकारक गोष्टी काही लोकांना आजही माहीत नाहीत. विंचू ही एक अशी प्रजात आहे की, अन्नाविना हा जीव वर्षभरापर्यंत जिवंत राहू शकतो. हा एक विषारी जीव असला तरी त्याचे विष माणसाला मारूही शकते आणि तारूही शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मेयो क्लिनिकच्या मते, विंचवाचा दंश झाला की, प्रचंड वेगाने विष शरीरात पसरते. तसेच त्याचा परिणामही लागलीच दिसून येतो.
मात्र, विंचवाच्या विषामुळे लोकांचा जीवही वाचवला जातो. या विषात अशी काही केमिकल्स आहेत की, त्यामुळे माणसाचा जीव वाचविला जाऊ शकतो. विचंवाच्या विषातील जसे की, क्लोरोटॉक्सिनचा वापर कॅन्सरवरील उपचारासाठी केला जाते. आशियामध्ये विंचवाच्या अनेक प्रजाती आढळतात, त्यांच्या विषात अँटिमायक्रोबियल पेप्टाईडस आढळते. याचा वापर बॅक्टेरियाचा संसर्ग कमी करण्यासाठी केला जातो. याशिवाय विषातील अँटी-इंफ्लेमेट्री तत्व आर्थराईटसच्या उपचारासाठी उपयोगी ठरते. अशा पद्धतीने विंचवाचे प्रसंगी जीव घेते आणि जीवही घेऊ शकते.