मांजराच्या डोळ्यासारखा नेब्युला

मांजराच्या डोळ्यासारखा नेब्युला

वॉशिंग्टन ः अवकाशीय रचना अनेक वेळा आपल्याला अचंबित करणार्‍याच असतात. विशेषतः नेब्युलाच्या रचना आपल्याला अनेक गोष्टींची आठवण करून देत असतात. काही दिवसांपूर्वी हाताच्या पंज्यासारख्या आकाराच्या नेब्यूलाचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. आता खगोलशास्त्रज्ञांनी एक असा नेब्यूला शोधून काढला आहे जो मांजराच्या डोळ्यासारखा दिसतो.

'नासा'ने या 'कॅट आय नेब्युला'चा एक व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नेब्यूलापासून निघणार्‍या लहरींना ध्वनीत रूपांतरीत करण्यात आले आहे. अंतराळातील डेटा खगोलशास्त्रज्ञांना समजू शकतो; पण सर्वसामान्य लोकांसाठी ते कठीणच असते. लोकांना या गोष्टी सहजपणे समजाव्यात यासाठी 'नासा'ने सोनिफिकेशनच्या माध्यमातून त्याला ध्वनीत रूपांतरीत केले आहे. 'नासा'ने म्हटले आहे की 'कॅट आय नेब्युला' हा एक 'प्लॅनेटरी नेब्युला' आहे. या नेब्युलामध्ये आपल्या सूर्यासारखे अनेक तारे बनतात. हा नेब्यूला पृथ्वीपासून 3,262 प्रकाशवर्ष अंतरावर आहे. 'नासा'ने 'इंटरनॅशनल कॅटस् डे'च्या निमित्ताने हा व्हिडीओ शेअर केलेला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news