भिंतीच्या पलीकडचेही पाहणारे पोर्टेबल डिव्हाईस

भिंतीच्या पलीकडचेही पाहणारे पोर्टेबल डिव्हाईस
भिंतीच्या पलीकडचेही पाहणारे पोर्टेबल डिव्हाईस
Published on
Updated on

नवी दिल्ली : भिंतीच्या पलीकडचे पाहणारे गॅझेट्स आपण कधी कधी चित्रपट अथवा कार्टून शोमध्ये पाहिले असेल. मात्र, आता इस्रायली कंपनीने असे डिव्हाईस विकसित केले आहे की, त्याच्या मदतीने भिंतीपलीकडच्या सर्व वस्तूंची माहिती मिळू शकणार आहे. इस्रायलस्थित फर्म असलेल्या कॅमेरो-टेकने हे महत्त्वपूर्ण डिव्हाईस तयार केले आहे. दर्रींशी 1000 पोर्टेबल आणि हाय परफॉर्मन्स डिव्हाईस असे त्याचे नाव आहे. कंपनीच्या मते, या डिव्हाईसच्या मदतीने भिंतीच्या पलीकडे काय काय आहे, याची माहिती मिळू शकते.

तसे पाहिल्या हे डिव्हाईस विकसित करणारी कॅमेरो टेक फर्म ही सॅमी केटसव ग्रुपचा भाग आहे. ही कंपनी ग्लोबल फ्रंटलाईन डिफेन्स, लॉ इन्फोर्समेंट सोल्युशन, मरिन इन्फ्रास्टक्‍चर आणि प्रॉपर्टी डेव्हलपमेंट सोल्युशनसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. दर्रींशी सेरिजचे यापूर्वीचे व्हर्जन सध्या जगभरातील 50 हून अधिक देशांतील लष्कर वापरत आहेत. यामुळे शत्रूच्या अचूक हालचालींची माहिती मिळवून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास मदत मिळते.

खरे तर दर्रींशी 1000 ला खासकरून सैन्य, लॉ इन्फोर्समेंटर एजन्सी आणि शोध व बचाव मोहिमेसाठी विकसित करण्यात आले आहे. यामध्ये 3ऊ 'डशपीश-ढर्हीेीसह-ढहश-थरश्रश्र' तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने माणसाला भिंतीच्या पलीकडच्या सर्व गोष्टींची माहिती मिळविणे सोपे जाते. एखादी व्यक्‍ती भिंतीपलीकडे उभी आहे, बसली आहे की झोपली आहे, त्याची उंची किती आहे? याची अचूक माहिती मिळते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news