प्रतिकारकशक्‍ती तपासण्यासाठी नवे किट

रोगप्रतिकारकशक्ती
रोगप्रतिकारकशक्ती
Published on
Updated on

वॉशिंग्टन ः कोरोना महामारीच्या काळात या विषाणू संसर्गाविरुद्ध लढण्यासाठी जगभरात अनेक लसी विकसित करण्यात आल्या व त्यांचे लसीकरणही करण्यात आले. यामुळे 'हर्ड इम्युनिटी' म्हणजेच सामूहिक रोगप्रतिकारक शक्‍ती विकसित करण्यासाठीही मदत झाली. आता शरीरात रोगप्रतिकारकशक्‍ती विकसित झाली आहे की नाही हे दर्शवणारे एक किटही अमेरिकेत तयार करण्यात आले आहे. रक्‍त नमुन्यांच्या मदतीने शरीरातील टी-सेलच्या (पांढर्‍या रक्‍तपेशी) तपासणीतून अशी 'इम्युनिटी' दिसून येते.

'नेचर बायोटेक्नॉलॉजी' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोरोना संसर्गानंतर शरीरात किती प्रमाणात रोगप्रतिकारकशक्‍ती विकसित झाली? तुम्हाला लस घेण्याची गरज आहे का? लस घेतल्यानंतर विषाणूशी लढण्यासाठी तुमच्या शरीरात पुरेशी शक्‍ती निर्माण झाली किंवा नाही, या सर्व प्रश्‍नांची उत्तरे तपासणीनंतर मिळतील. या किटच्या आधारे लसीकरण मोहीम राबवली जाऊ शकेल. इम्युनिटी तपासणीसाठी टी-सेल टेस्ट संपूर्णपणे नवे नाही.

अमेरिकेतील अन्‍न व औषध प्रशासनाने गेल्या वर्षीच टी-सेल परीक्षणाला आणीबाणीच्या स्थितीत वापरण्यास परवानगी दिली होती. संशोधक अर्नेस्टो गुचिआन यांनी सांगितले की कोरोनातून बाहेर पडलेल्या प्रत्येक रुग्णात पुरेशा अँटिबॉडी विकसित होत नाहीत. अँटिबॉडी विकसित झाली तरी ती आठ आठवड्यांपेक्षा जास्त नसते. मात्र, टी-सेल्सची स्मरणशक्‍ती अनेक वर्षे राहते. इम्युनिटी का तयार झाली नाही याचे कारण या टी-सेल्सवरून समजू शकेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news