दहा वर्षांच्या भारतीय मुलाने मिळवले छायाचित्र स्पर्धेत यश

दहा वर्षांच्या भारतीय मुलाने मिळवले छायाचित्र स्पर्धेत यश
Published on
Updated on

लंडनः

येथील प्रसिध्द अशा नैसर्गिक इतिहास संग्रहालयातर्फे दरवर्षी 'वन्यजीव छायाचित्रण' स्पर्धा आयोजित केली जाते. ही एक प्रतिष्ठित अशी वन्यजीव छायाचित्रण स्पर्धा आहे. यावर्षी या स्पर्धेत दहा वर्षांच्या विद्युन हेब्बर या भारतीय मुलाने विजेतेपद पटकावले. त्याला लहान मुलांच्या गटात पहिले स्थान मिळाले.

ही जगातील सर्वात जूनी म्हणजेच गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेली स्पर्धा आहे. स्पर्धेसाठी तब्बल 95 देशांमधून 50  हजाराहून अधिक छायाचित्रे आली. बंगळूरमधील विद्युन या पाचवीत शिकणार्‍या विद्यार्थ्याला स्पर्धेत 'यंग वाईल्डलाईफ फोटोग्राफर  ऑफ द इअर' हा पुरस्कार देण्यात आला.

त्याने वयाच्या अवघ्या तीन वर्षांचा असल्यापासूनच फोटोग्राफी सुरू केली होती. या वयात अनेक मुलं खेळण्यातील कॅमेर्‍याने खेळत असतात. मात्र त्याने याच वयात फोटोग्राफीचे धडे गिरवले. एका थीम पार्कमध्ये फिरत असताना त्याने एका कोळ्याचा फोटो टिपला होता. हाच फोटो त्याने स्पर्धेसाठी पाठवला होता. या फोटोतील इंद्रधनुष्यी रंगांची पार्श्वभूमीही सुंदररित्या टिपण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news