‘झोप न घेणारी महिला’

‘झोप न घेणारी महिला’
Published on
Updated on

बीजिंग : एक रात्र नीट झोप आली नाही की दुसर्‍या दिवशी आपले कामात मन लागत नाही. अशा स्थितीत कुणी तब्बल चाळीस वर्षे झोपेशिवाय काढली असतील याची आपल्याला कल्पनाही करवणार नाही. चीनमध्ये अशी एक महिला आहे. तिने गेल्या 40 वर्षांमध्ये एक क्षणही झोप घेतलेली नाही.

चीनच्या हेनान प्रांतात ही महिला राहते. तिचे नाव ली ज्हानयिंग. आपण अखेरचे पाच-सहा वर्षांची असताना झोपलो होतो असे तिने म्हटले आहे. सध्या तिचे वय 46 वर्षे आहे. या महिलेचा पती लियू सुओक्‍विन याने तिच्या या दाव्याची पुष्टी केली आहे. आपण आजपर्यंत पत्नीला झोपलेले पाहिले नाही, असे या माणसाने म्हटले आहे. झोप येत नसल्याने रात्री निव्वळ वेळ घालवण्यासाठी म्हणून ती काही ना काही घरकाम करीत असते. सुरुवातीला ती झोपेच्या गोळ्या घेत होती; पण त्यापासूनही तिला काही लाभ झाला नाही.

विशेष म्हणजे 'झोप न घेणारी महिला' म्हणून ती आपल्या गावातही लोकप्रिय आहे. अनेक लोक तिची परीक्षा घेण्यासाठी म्हणून येतात. हे लोक तिच्या घराबाहेर बसून पत्ते खेळत राहतात आणि रात्री वाढेल तसे तेच कंटाळून झोपी जातात. ली हीने अनेक डॉक्टरांकडे तपासणी केली आहे; पण तिच्या आजाराचे अद्यापही निदान झालेले नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news