चक्क टचस्क्रीन असलेले कापड!

वहनक्षमता असलेल्या धाग्यांचा वापर
touchscreen clothing
चक्क टचस्क्रीन असलेले कापड!Pudhari file Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : सध्याचा जमाना ‘वेअरेबल गॅझेटस्’चा म्हणजेच शरीरावर परिधान करता येऊ शकणार्‍या आधुनिक उपकरणांचा आहे. ‘गुगल’ या तंत्रज्ञान कंपनीने स्पर्श पडद्यासारखे म्हणजेच टचस्क्रीन असलेले कपडेही बनवण्याचा प्रोजेक्ट सुरू केला होता, हे तुम्हाला माहिती आहे का? हे कपडे वाहकतेचा गुणधर्म असलेल्या धाग्यांपासून बनवण्यात येतात.

या प्रकल्पाचे नाव ‘जॅकार्ड’ असे असून, गुगलच्या अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी अँड टेक्नॉलॉजी प्रयोगशाळेत याबाबतचे प्रयोग झाले. त्यामध्ये स्मार्ट धागे वापरण्यात आले आहेत. ते स्पर्श संवेदनशील असतील व नेहमीच्या धाग्यांबरोबर विणले जातील. स्पर्शपडद्यात वापरले जाणारे धागे बारीक, धातूच्या संमिश्रापासून बनवलेले असतात. ते कापसाच्या व रेशमी धाग्यांबरोबर वापरता येते. जॅकार्ड धागे असे वापरले जातात, ज्यात ते वापरणार्‍याला कुठे वापरले आहेत हे दुप्पट जाडीवरून समजते; पण एरवी ते बाहेरून कळत नाही. वहनक्षमता असलेल्या धाग्यांचा वापर यात केला जातो. या कपड्यांना स्पर्श कळतो किंवा हातांच्या इशार्‍यांवरून कृतीचा संदेश मिळतो. या कपड्यात मोठ्या पृष्ठभागात ते धागे विणले जातात. त्यामुळे आंतरक्रियात्मक पृष्ठभाग मोठा असतो. यातील सर्किटस हे जॅकेटच्या बटनपेक्षा मोठे असणार नाहीत, वहनक्षमता असलेले धागे जोडून ते तयार केले जातील. इलेक्ट्रॉनिक्सचा हा सूक्ष्म अवतार येथे वापरला जाणार आहे. स्पर्शाच्या माध्यमातून तुम्हाला या कपड्यातून इलेक्ट्रॉनिक उपकरणांना संदेश देता येऊ शकतो. यंत्राला समजू शकणार्‍या अलगॉरिथमचा वापर यात केला जातो. स्पर्श व हातवार्‍यांतून मिळणारी माहिती बिनतारी पद्धतीने मोबाईल फोनकडे वाहून नेली जाते. इतर अनेक उपकरणेही त्यावर चालवता येतात. त्यातून ऑनलाईन सेवा, अ‍ॅप्स चालवता येतात. गुगलने या धाग्यांचे प्रात्यक्षिक दाखवले असून, त्यात फिलिप्सचे रंगीत दिवे स्पर्शाच्या माध्यमातून नियंत्रित करण्यात येतात. या कपड्यावर टिचकी मारली तर दिवे चालू होतात किंवा बंद होतात व विविध रंगांचे दिवे लावण्याचा क्रमही त्यात आणता येतो, त्याची प्रकाशमानता कमी-जास्त करता येते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news