लंडन : बिटिश वैज्ञानिकांनी कर्करोगाचा धोका घटवणार्या गव्हाचे नवे वाण विकसित केले आहे. त्यांनी जीन एडिटिंगच्या तंत्राने गव्हाच्या या नव्या प्रजातीमधील 'एसपर्जिन' नावाच्या अमिनो अॅसिडचे प्रमाण घटवले आहे. या अमिनो अॅसिडमुळे कर्करोगाचा धोका वाढतो असे या बिटिश संशोधकांचे म्हणणे आहे.
बिस्टल युनिव्हर्सिटीचे संशोधक हर्टफोर्डशायरमध्ये सध्या गव्हाच्या या जनुकीय सुधारित पिकांचे उत्पादन घेत आहेत. हा प्रकल्प पाच वर्षे चालणार आहे. इंग्लंडमध्ये तसेच युरोपमध्येही जीन एडिटिंगच्या तंत्राने गव्हाचे नवे वाण विकसित करून त्याचे पीक घेण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. चीन आणि अमेरिकेत यापूर्वी असे घडलेले आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की ज्यावेळी साधारण गव्हापासून बनवलेल्या ब—ेडला बेक्ड किंवा रोस्ट केले जाते त्यावेळी त्यामधील 'एसपर्जिन' हे कर्करोगास कारणीभूत होणार्या 'एक्रेलामाईड'मध्ये रूपांतरित होते. त्यामुळे जीन एडिटिंग करून गव्हातील या 'एसपर्जिन'ला हटवण्यात आले आहे.
बिस्टल युनिव्हर्सिटीतील संशोधक 1990 पासून 'जेनेटिकली मॉडिफाईड' म्हणजेच जनुकीय सुधारित पिकांचे उत्पादन घेत आहेत. संशोधक निगेल हाफोर्ड यांनी सांगितले की 2002 मध्ये एक्रेलामाईडचा शोध लावण्यात आला होता. उंदरांवर करण्यात आलेल्या प्रयोगातून हे दिसून आले होते की ते कर्करोगाचे कारण बनू शकते. नव्या वाणातील गव्हामध्ये एक्रेलामाईड या अमिनो अॅसिडचे प्रमाण सामान्य गव्हाच्या तुलनेत 90 टक्के कमी आहे.