आशियातील सर्वात मोठा लिक्विड मिरर टेलिस्कोप

आशियातील सर्वात मोठा लिक्विड मिरर टेलिस्कोप
आशियातील सर्वात मोठा लिक्विड मिरर टेलिस्कोप

नवी दिल्ली ः अनेक आकाशगंगा आणि अन्य खगोलीय स्रोतांचे निरीक्षण करणे ज्यामुळे शक्य होणार आहे असा लिक्विड मिरर टेलिस्कोप उत्तराखंडच्या देवस्थळात उभा करण्यात आला आहे. उत्तराखंडच्या एका टेकडीवर हा टेलिस्कोप कार्यान्वितही केला आहे. 'इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोप' (आयएलएमटी) हा देशातील पहिला लिक्विड मिरर टेलिस्कोप असून तो आशियातील सर्वात मोठा लिक्विड मिरर टेलिस्कोप आहे.

बेल्जियम आणि कॅनडाच्या सहकार्याने देवस्थळ, नैनिताल येथे हा टेलिस्कोप बसवण्यात आला असून या हायटेक दुर्बिणीच्या कार्याचे परिणाम समोर येण्यास अजून वेळ आहे. 50 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला हा 4 मीटरचा टेलिस्कोप कार्यान्वित झाल्यानंतर आता खगोलशास्त्रीय संशोधनासाठी ही मोठीच संधी मानली जात आहे. या टेलिस्कोपच्या माध्यमातून खगोलशास्त्रीय तुकडे, लघुग्रह, सुपरनोव्हा आणि गुरुत्वाकर्षण भिंग इत्यादींची माहिती घेण्यात मोठी मदत होईल.

जगात याआधीही लिक्विड मिरर टेलिस्कोपचा वापर करण्यात आला आहे. मात्र, 'एआरआयईएस'चे संचालक दीपंकर बॅनर्जी यांच्या म्हणण्यानुसार या दुर्बिणीचा वापर खगोलशास्त्रीय निरीक्षणासाठी जगात प्रथमच केला जात आहे. आर्यभट्ट खगोलशास्त्रीय संशोधन संस्थेचे प्रा. बॅनर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार ही दुर्बिण गेल्या आठवड्यात संस्थेत आली असून तिच्या तांत्रिक मंजुरीसाठी कार्यवाही सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news