Zoox Robotaxi | स्टेअरिंगशिवाय धावणाऱ्या ‘झुक्स’च्या रोबोटॅक्सीमध्ये मिळणार हाय-टेक सुविधा

Zoox Robotaxi |
Zoox Robotaxi | स्टेअरिंगशिवाय धावणाऱ्या ‘झुक्स’च्या रोबोटॅक्सीमध्ये मिळणार हाय-टेक सुविधा
Published on
Updated on

सॅन फ्रान्सिस्को : अ‍ॅमेझॉन कंपनीची मालकी असलेल्‍या ‘झुक्स’ कंपनीने आपल्या स्टेअरिंग आणि पेडल नसलेल्या पूर्णपणे स्वयंचलित इलेक्ट्रिक रोबोटॅक्सीची नवीन आवृत्ती सादर केली आहे. तंत्रज्ञानाचा केवळ देखावा न करता, प्रवाशांचा प्रवास अधिक सुखावह आणि आरामदायी कसा होईल, यावर या नवीन डिझाईनमध्ये भर देण्यात आला आहे. सुमारे ५ लाख प्रवाशांच्या अभिप्रायावरून (फिडबॅक) कंपनीने हा अंतर्गत बदल केला आहे.

गाडीच्या सीट आणि हेडरेस्टमध्ये अधिक पॅडिंग आणि अर्गोनॉमिक कर्व्स देण्यात आले आहेत, त्‍यामुळे खडबडीत रस्त्यांवरही प्रवाशांना त्रास होणार नाही. अंतर्गत भागात 'अलोवेरा-ग्रीन' रंगाच्या सीट आणि 'स्टोन-ग्रे' रंगाचे फ्लोअरिंग वापरण्यात आले आहे. यामुळे केबिनमध्ये शांत वातावरण वाटते आणि प्रवाशांना त्यांच्या वस्तू (फोन, चाव्या) गाडीत शोधणे सोपे जाईल. फोन घसरू नये म्हणून वायरलेस चार्जिंग पॅडला विशेष कप्पे देण्यात आले आहेत, तसेच कपहोल्डर्सचा आकार मोठा करण्यात आला आहे.

स्टेअरिंग आणि पेडल नाहीच!

झुक्सच्या या वाहनाचे मूळ डिझाईन बदललेले नाही. ही गाडी एखाद्या सामान्य कारसारखी नसून विशेष रोबोटॅक्सी म्हणून तयार करण्यात आली आहे, त्‍यामध्‍ये ड्रायव्हरची सीट, स्टेअरिंग किंवा पारंपरिक कंट्रोल्स नाहीत. यामध्ये चार प्रवासी आमनेसामने बसू शकतात. तसेच यात मूनरूफ आणि 'स्टारी नाईट' लायटिंग देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news