Zombie star | पृथ्वीजवळील ‘झोम्बी’ तारा सोडतोय इंद्रधनुष्यासारख्या लहरी

Zombie star
Zombie star | पृथ्वीजवळील ‘झोम्बी’ तारा सोडतोय इंद्रधनुष्यासारख्या लहरी
Published on
Updated on

वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या जवळ एका अशा ‘झोम्बी’ तार्‍याचा शोध लावला आहे, जो आपल्या ‘मिल्की वे’ या आकाशगंगेतून प्रवास करताना सातत्याने इंद्रधनुष्यासारख्या रंगीत लहरी उत्सर्जित करत आहे. आपल्या जोडीदार तार्‍यालाच गिळंकृत करणार्‍या या मृत तार्‍याच्या विचित्र वागण्याने शास्त्रज्ञ चक्रावून गेले आहेत.

आकाशगंगेतील सूर्य आणि इतर सर्व तारे केंद्रातील ‘सॅजिटेरियस ए’ या महाकाय कृष्णविवराभोवती फिरत असतात. या प्रवासादरम्यान, तार्‍यांतून बाहेर पडणारा वायू आणि धूळ जेव्हा अंतराळातील इतर पदार्थांशी आदळते, तेव्हा तार्‍याच्या पुढे लाटांसारखी रचना तयार होते. याला विज्ञानात ‘बो शॉक’ म्हणतात. हे अगदी समुद्रात चालणार्‍या जहाजाच्या टोकाभोवती तयार होणार्‍या लाटांसारखे असते. साधारणपणे, मृत झालेले तारे म्हणजेच ‘पांढरे खुजे’ हे शांत असतात. त्यांच्यातून कोणताही वायू बाहेर पडत नसल्याने त्यांच्याभोवती ‘बो शॉक’ तयार होत नाही.

मात्र, ‘नेचर अ‍ॅस्ट्रोनॉमी’ या नियतकालिकात 12 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, पृथ्वीपासून 730 प्रकाशवर्षे दूर असलेल्या ‘ठदग0528+2838’ या पांढर्‍या खुज्या तार्‍याभोवती असा शॉक वेव्ह दिसून आला आहे. हा तारा एका ‘बायनरी सिस्टीम’चा (द्वैती तारा प्रणाली) भाग आहे. यामध्ये हा ‘झोम्बी’ तारा आपल्या शेजारील सूर्यासारख्या तार्‍याला हळूहळू खात आहे, म्हणूनच याला झोम्बी तारा म्हटले जात आहे. चिली येथील ‘व्हेरी लार्ज टेलिस्कोप’च्या साहाय्याने या तार्‍याचे निरीक्षण करण्यात आले.

संशोधकांना असे आढळले की, विशाल विस्तार: या तार्‍याभोवतीचा हा शॉक वेव्ह पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतराच्या तुलनेत 4,000 पट जास्त पसरलेला आहे. इंद्रधनुषी रंगांचे गूढ : या लहरींमध्ये रंगीत वायू आणि धुळीचा दाट ढग (नेब्युला) आहे, जो इंद्रधनुष्यासारखा दिसतो. आयुष्य : हा शॉक वेव्ह किमान 1,000 वर्षे जुना असल्याचे मानले जात आहे. हे शोधकार्य खगोलशास्त्रज्ञांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. कारण, मृत तार्‍याभोवती अशी सक्रिय रचना असणे हे विज्ञानाच्या प्रचलित नियमांच्या विरुद्ध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news