Dubai tallest hotel | दुबईत जगातील सर्वात उंच नवे हॉटेल

worlds-tallest-new-hotel-in-dubai
Dubai tallest hotel | दुबईत जगातील सर्वात उंच नवे हॉटेल
Published on
Updated on

दुबई : संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई शहर हे आता ‘नवलाईचे नगर’ बनलेले आहे. समुद्रातील पाम वृक्षाच्या आकारातील कृत्रिम बेट व त्यावरील इमारती, जगातील सर्वात उंच इमारत असलेली ‘बुर्ज खलिफा’, वाळवंटात फुलवलेली जगातील सर्वात मोठी फुलबाग ‘मिरॅकल गार्डन’ अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी दुबईत पाहायला मिळतात. आता दुबईमध्ये एक हॉटेल बांधण्यात आले आहे, जे जगातील सर्वात उंच हॉटेल ठरत आहे.

याआधीचे सर्वात उंच हॉटेल देखील दुबईमध्येच उभारले गेले आहे. दुबई आपल्या उंच इमारतींसाठी प्रसिद्ध आहे आणि संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई शहराच्या नावावर आता हा आणखी एक विक्रम प्रस्थापित होणार आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये ‘सिएल दुबई मरीना’ (Ciel Dubai Marina)चे दरवाजे लोकांसाठी उघडणार आहे. सीएल दुबई मरीना हॉटेल 377 मीटर उंच असणार आहे आणि येथे 82 मजल्यांवर 1004 खोल्या असतील. हे जगातील सर्वात उंच हॉटेल बनेल आणि सध्याचा विक्रम धारक 356 मीटर उंच गेव्होरा हॉटेलला मागे टाकेल.

अख्खं हॉटेल पूर्णपणे काचेचे डिझाईन केलेले असून, येथून लोकांना पाम जुमेराह आणि अरबी आखाताचे द़ृश्य पाहायला मिळेल. जगातील सर्वात उंच इन्फिनिटी पूल या हॉटेलचे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य आहे. 77 व्या मजल्यावर स्थित या इन्फिनिटी पूलने सध्याच्या रेकॉर्ड धारक अ‍ॅड्रेस बीच रिसॉर्टच्या 294 मीटर उंचीच्या पूलला मागे टाकले आहे. या हॉटेलमध्ये 7 रेस्टॉरंटस्, 61 व्या मजल्यावर एक लक्झरी स्पा आणि जगभरातील पाहुण्यांसाठी सर्वोत्तम सुविधा असतील.

तसेच इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल्स ग्रुप (IHG) च्या विग्नेेट कलेक्शन ब—ँड अंतर्गत हे चालवले जाईल. दुबईच्या मरिनाच्या एन्ट्री गेटवर सीएल दुबई मरीना हॉटेल स्थित आहे, जिथून मरीना बोर्डवॉक, शॉपिंग मॉल, बीच आणि ट्राम-मेट्रोपर्यंत सहज प्रवेश मिळतो. याशिवाय दुबईतील प्रसिद्ध पाम जुमेराह आणि अपटाउन दुबई देखील काही मिनिटांच्या अंतरावर आहेत. द फर्स्ट ग्रुपचे सीईओ रॉब बर्न्स म्हणाले, ‘आमचे स्वप्न प्रत्यक्षात येत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. अरबी आखात आणि दुबईच्या क्षितिजाच्या अतुलनीय द़ृश्यांसह हे स्थान परिपूर्ण आहे.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news