Crocodiles Hunting Bats | सर्वात लहान मगरी वटवाघळांची शिकार करताना कॅमेऱ्यात कैद

शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच पाहिले दुर्मीळ दृश्य
Crocodiles Hunting Bats |
Crocodiles Hunting Bats | सर्वात लहान मगरी वटवाघळांची शिकार करताना कॅमेऱ्यात कैद
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन : जगातील सर्वात लहान मगरी वटवाघळांची शिकार करण्यासाठी जमिनीखालील गूढ गुंफामध्ये चोरट्या मार्गाने कसा हल्ला करतात, हे दर्शवणारा एक दुर्मीळ व्हिडीओ समोर आला आहे. हा प्रकार मानवी इतिहासात पहिल्यांदाच कॅमेऱ्यात नोंदवला गेला आहे.

नॅशनल जिओग्राफिकच्या आगामी ‘आफ्रिका : अर्थ्स वाईल्ड होम’ या मालिकेसाठी हे चित्रीकरण करण्यात आले आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून गॅबॉनमधील गूढ गुहांमध्ये राहणाऱ्या लहान आकाराच्या मगरींच्या जीवनाची एक खास झलक पाहायला मिळते. ‘ड्वार्फ क्रोकोडाईल्स’ (Osteolaemus tetraspis) या मगरींची लांबी साधारणपणे केवळ ५ फूट (१.५ मीटर) पर्यंत वाढते. या मगरी पश्चिम आणि मध्य आफ्रिकेत आढळतात. सामान्यतः त्या जंगल, नद्या, दलदल आणि जमिनीवरील जलाशयांच्या आसपास राहतात. मात्र, व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेली गुहेतील मगरींची प्रजाती अत्यंत अद्वितीय आहे.

२००८ मध्ये शोध लागलेली ही मगरींची टोळी मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या गॅबॉनमधील दूरवरच्या ‘अबांडा’ गुंफामध्ये राहते. या भुयारी गुहांमध्ये पूर्ण अंधार असतो आणि वटवाघळांच्या विष्ठेचे मोठे ढीग साचलेले असतात. या मगरी वटवाघळे आणि किड्यांची शिकार करतात, हे संशोधकांना ठाऊक होते; परंतु त्या नेमकी कशी शिकार करतात हे स्पष्ट नव्हते, कारण गुहेत माणसे असताना मगरी शिकार करत नव्हत्या.

आता काही धाडसी शास्त्रज्ञ, चित्रपट निर्माते आणि विशेष रिमोटी कॅमेऱ्यांच्या मदतीने या मगरींची शिकारीची पद्धत पहिल्यांदाच जगासमोर आली आहे. संवर्धन पर्यावरण शास्त्रज्ञ आणि रोलेक्स नॅशनल जिओग्राफिक परपेच्युअल प्लॅनेट एक्स्प्लोरर मॅट शर्ली यांनी सांगितले, ‘मी गेल्या १५-१६ वर्षांपासून या मगरींवर संशोधन करत आहे, परंतु हे दृश्य आम्ही यापूर्वी कधीही पाहू शकलो नव्हतो. मी तिथे असेपर्यंत मगरी त्यांची नैसर्गिक शिकार करण्याची पद्धत दाखवत नसत.’ मात्र, नव्या तंत्रज्ञानामुळे त्यांचे हे अनोखे वर्तन प्रथमच कॅमेऱ्यात टिपण्यात यश आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news