Violence Discovered in Israeli Cave | १० लाख वर्षांपूर्वीच्या मानवावर झाला होता जीवघेणा हल्ला

इस्रायलमधील गुहेत सापडला जगातील सर्वात जुन्या हिंसेचा पुरावा
Violence Discovered in Israeli Cave |
Violence Discovered in Israeli Cave | १० लाख वर्षांपूर्वीच्या मानवावर झाला होता जीवघेणा हल्ला
Published on
Updated on

तेल अवीव : सुमारे एक लाख वर्षांपूर्वी अश्मयुगात एका आदिमानवाच्या (होमो सेपियन्स) चेहऱ्यावर टोकदार दगडाच्या हत्याराने वार करण्यात आला होता आणि नंतर त्याला सध्याच्या इस्रायलमधील एका गुहेत दफन करण्यात आले होते, असा निष्कर्ष पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी काढला आहे. संशोधकांच्या मते, मानवी इतिहासातील आपापसांतील हिंसेचा हा आतापर्यंतचा सर्वात जुना पुरावा असू शकतो.

‘सायंटिफिक रिपोर्टस्‌’ या नियतकालिकात ३० जून रोजी प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात, आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाने एका व्यक्तीच्या कवटीचे आणि खालच्या जबड्याचे बारीक निरीक्षण केले. हा मानव ‘मध्य पुराश्मयुगात’ इस्रायलमधील ‘काफझेह’ गुहेत काळजीपूर्वक दफन करण्यात आला होता. सुमारे १,४५,००० ते ९२,००० वर्षांपूर्वी या गुहेत किमान २७ लोकांना दफन करण्यात आले होते. आफ्रिका खंडाबाहेर सापडलेले हे आपल्या मानवी प्रजातीचे (Homo sapiens) सर्वात जुने पूर्वज मानले जातात. या सांगाड्यांचे उत्खनन १९३० ते १९७० च्या दशकात करण्यात आले होते.

आधीच्या अभ्यासात दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले होते. संशोधकांनी आधुनिक मायक्रोस्कोपिक आणि मायक्रो सीटी स्कॅनिंग तंत्रज्ञानाचा वापर करून ‘काफझेह २५’ असे नाव दिलेल्या एका प्रौढ पुरुषाच्या सांगाड्याची पुन्हा तपासणी केली. यामध्ये त्याच्या डाव्या जबड्यावर आणि वरच्या जबड्याच्या काही भागावर जखमेच्या खुणा आढळल्या. हा वार इतका तीव्र होता की त्याचा परिणाम त्याच्या एका दाढेवरही झाला होता. जबड्याचे हाड बरे झाल्याची चिन्हे दिसून आली आहेत. याचा अर्थ या हल्ल्यानंतरही तो माणूस बऱ्याच काळासाठी जिवंत राहिला होता. मध्य पुराश्मयुगातील सांगाड्यांवर टोकदार हत्यारांनी जखमा झाल्याची फार कमी उदाहरणे आधी समोर आली आहेत. या जखमा शिकारीच्या वेळी झालेल्या अपघातांमुळे असू शकतात, तरीही संशोधकांनी याला दोन मानवांमधील हिंसेचाच पुरावा मानले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news