World’s Most Unique Beach | जगातील सर्वात अनोखा समुद्रकिनारा!

ग्रीसच्या मिलोस बेटावरील सराकिनिको बीच
World’s Most Unique Beach |
World’s Most Unique Beach | जगातील सर्वात अनोखा समुद्रकिनारा!
Published on
Updated on

लंडन : जगभरात असंख्य सुंदर समुद्रकिनारे आहेत. कुठे सोनेरी वाळू, कुठे निळाशार समुद्र तर कुठे उंचच उंच लाटा पर्यटकांना आकर्षित करतात, पण ग्रीसमध्ये असा एक समुद्रकिनारा आहे, ज्याचं रूप पाहिल्यावर तुम्हाला पृथ्वीवर नसून एखाद्या दुसऱ्याच ग्रहावर आल्याचा भास होऊ शकतो. पांढरेशुभ्र खडक, गुळगुळीत दगडांची अनोखी रचना आणि काचेसारखं स्वच्छ निळं-फिरोजी रंगाचं पाणी यामुळे हा समुद्रकिनारा अक्षरशः चंद्रासारखा सुंदर दिसतो. त्यामुळेच त्याला ‘मून-लाईक बीच’ असंही म्हटलं जातं.

हा समुद्रकिनारा ग्रीसमधील मिलोस या सुंदर बेटावर आहे. त्याचं नाव सराकिनिको बीच. मिलोस हे एजियन समुद्रातील सायक्लेडस्‌ बेटसमूहाचा भाग आहे. सराकिनिकोच्या पांढऱ्या ज्वालामुखीजन्य खडकांना समुद्राच्या लाटा आणि उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांनी हजारो वर्षांत नैसर्गिक आकार दिला आहे. या खडकांचा रंग आणि त्यांची गुळगुळीत, वळणदार रचना इतकी वेगळी आहे की, पहिल्यांदा पाहणाऱ्याला हा परिसर चंद्रावरील असल्यासारखा वाटतो. सराकिनिको बीचचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे त्याचे पांढरेशुभ्र खडक आणि त्यामध्ये तयार झालेली नैसर्गिक वळणं.

खडकांच्या मध्ये समुद्राचं पारदर्शक निळं पाणी दिसतं. अनेक ठिकाणी पर्यटक या उंच खडकांवरून थेट समुद्रात उड्या मारतात. ही इथली सर्वात लोकप्रिय अ‍ॅक्टिव्हिटी मानली जाते. याशिवाय नैसर्गिक गुहांमध्ये पोहणे, स्नॉर्कलिंग करणे किंवा पांढऱ्या खडकांवर निवांत बसून उन्हाचा आनंद घेणं, असे अनेक अनुभव पर्यटक घेऊ शकतात. या ठिकाणाचं वैशिष्ट्य इतकं वेगळं आहे की, अनेक पर्यटकांनी आपल्या प्रवासाच्या अनुभवात त्याची तुलना थेट अंतराळातील दृश्यांशी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news