‘या’ देशात मिळते सर्वात महागडे पाणी

‘या’ देशात मिळते सर्वात महागडे पाणी
File Photo
Published on
Updated on

जीनिव्हा : पाण्याला आपल्याकडे ‘जीवन’ असे समर्पक नाव आहे. पाण्याशिवाय जीवन संभवत नाही. उन्हाळ्यात तर पावलोपावली पाण्याची आठवण येत असते. एकेकाळी पाणी म्हणजे फुकटचा पदार्थ अशीच सर्वांची भावना असे; पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. आता पाणीही विकत घ्यावे लागते. तुम्ही कधी विचार केला आहे का?, जे पाणी तुम्ही भारतात काही रुपये देऊन सहज विकत घेता, तेच पाणी जगातील काही देशांमध्ये इतके महाग विकले जाते की, तुम्हाला ऐकून धक्का बसेल. विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्यापैकी अनेकजण बाटलीतून पाण्याचा घोट घेऊन फेकून देतात; पण हेच पाणी इतर कुठल्या तरी देशात खूप मौल्यवान आहे. कल्पना करा, पाण्याची बाटली विकत घ्यायला गेलात आणि तुम्हाला 300-400 रुपयांचं बिल आलं तर कसं वाटेल? अहो, असंच काहीसं अनेक देशांमध्ये आहे. आज आम्ही तुम्हाला याचीच माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

स्वित्झर्लंड ही जगातील सर्वात महागड्या पिण्याच्या पाण्याची बाजारपेठ आहे. येथे 330 मिलीच्या छोट्या बाटलीची किंमत सुमारे 347 रुपये आहे. लिटरमध्ये मोजले तर एक लिटर पाण्याची किंमत सुमारे 1050 रुपये आहे. म्हणजे तिथे राहून रोज फक्त एक लिटर पाणी विकत घेतलं तर महिन्याभरात फक्त पाण्यावर 30 हजार रुपये खर्च होतील. आता आपण भारताबद्दल बोलूया. भारतात मिनरल वॉटरच्या बाटलीची सरासरी किंमत 20 ते 25 रुपये आहे आणि नळाचे पाणी वापरले तर ते आणखी स्वस्त आहे. उदाहरणार्थ, मुंबईसारख्या मोठ्या शहरात एक लाख लिटर पाण्याचे बिल केवळ 525 रुपये येते. म्हणजे इथल्या एक लिटर पाण्याची किंमत एक पैशापेक्षाही कमी आहे. याची कारणे अनेक आहेत. उदाहरणार्थ, स्वित्झर्लंडसारख्या देशात पाणी स्वच्छ करण्याचे तंत्रज्ञान महाग आहे, मजुरी जास्त आहे आणि नैसर्गिक स्रोतांचे पाणी सहजासहजी मिळत नाही. दुसरीकडे, भारतात पाण्याचे स्रोत अधिक आहेत आणि सरकारदेखील पाण्याचे दर कमी ठेवण्याचा प्रयत्न करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news