World Most expensive vegetable | जगातील सर्वात महागडी भाजी

World Most expensive vegetable
World Most expensive vegetable | जगातील सर्वात महागडी भाजीPudhari File photo
Published on
Updated on

लंडन ः जेव्हा जेव्हा आपण महागड्या खाद्यपदार्थांबद्दल बोलतो, तेव्हा आपल्या मनात फक्त सोन्याचा वर्ख असलली मिठाई किंवा महागड्या फळांचा गोडवा समोर येते. परंतु, अशा काही भाज्या देखील आहेत ज्या इतक्या दुर्मीळ आणि मौल्यवान आहेत की, त्यांची किंमत लक्झरी घड्याळांशी स्पर्धा करू शकते. हॉप शूट ही जगभरातील सर्वात महागड्या भाज्यांपैकी एक आहे. तिची किंमत 85,000 ते 1,00,000 रुपये प्रति किलोपर्यंत असू शकते.

या भाजीची लागवड करणे कठीण असते. ही रोपे सरळ ओळीत वाढत नाहीत, त्यामुळे यंत्राने कापणी करणे अशक्य होते. शेतकर्‍यांना प्रत्येक हॉप शूट स्वतंत्रपणे शोधावे लागेल आणि हाताने तोडावे लागेल. या संपूर्ण प्रक्रियेस बराच वेळ आणि मेहनत लागते. 1 किलो गोळा करण्यासाठी शेकडो हॉप शूटची आवश्यकता आहे. हे खूप महाग आहे. कारण, त्यात ह्युमुलोन आणि ल्युपोलोन सारख्या नैसर्गिक आम्लांचा समावेश आहे.

हे दोन्ही आम्ल कर्करोगाच्या पेशी आणि टीबीसारख्या आजारांशी लढायला मदत करू शकतात. गुच्ची मशरूम ही देखील नैसर्गिकरीत्या उद्भवणारी सर्वात महाग भाजी आहे. जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या जंगलात आढळणार्‍या या भाजीची किंमत प्रति किलो 30,000 ते 40,000 रुपये दरम्यान आहे. हे इतके महाग आहे. कारण, त्याची लागवड केली जाऊ शकत नाही. गुच्ची मशरूम केवळ विशेष नैसर्गिक परिस्थितीतच वाढतात. बर्फवृष्टी आणि वादळानंतर हे सहसा थंड डोंगराळ भागात वाढते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news