

लंडन : फुलांच्या जगात सौंदर्य, सुगंध आणि दुमीर्र्ळतेला मोठे महत्त्व असते. मात्र या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एक गुलाब असा आहे, जो ‘जगातील सर्वात महागडा गुलाब’ म्हणून ओळखला जातो. हा गुलाब म्हणजे ‘ज्युलिएट रोज’! प्रसिद्ध इंग्लिश गुलाब तज्ज्ञ डेव्हिड ऑस्टिन यांनी या गुलाबाची निर्मिती केली. विशेष बाब म्हणजे, या एका गुलाबाच्या जातीसाठी तब्बल 15 वर्षांचे संशोधन करण्यात आले. या दीर्घ संशोधन प्रक्रियेसाठी सुमारे 15 दशलक्ष अमेरिकी डॉलर (भारतीय चलनात अंदाजे 120 कोटी रुपये) खर्च झाला. यामुळेच ‘ज्युलिएट रोज’ हा आजवरचा सर्वात महागडा गुलाब मानला जातो.
‘ज्युलिएट रोज’चा रंग आडू किंवा पीच-एप्रिकॉट छटेचा असून, त्याच्या पाकळ्या अत्यंत नाजूक आणि परिपूर्ण सममितीत मांडलेल्या असतात. या गुलाबाला सौम्य पण मनमोहक असा सुगंध लाभलेला आहे. त्यामुळेच लग्नसमारंभ, राजेशाही कार्यक्रम आणि खास प्रसंगी या गुलाबाला विशेष मागणी असते. 2006 साली लंडनमधील चेल्सिया फ्लॉवर शो मध्ये ‘ज्युलिएट रोज’ प्रथमच जगासमोर सादर करण्यात आला. तेव्हापासून या गुलाबाला ‘थ—ी मिलियन पाऊंड रोज’ असेही संबोधले जाते.
त्याच्या सौंदर्याबरोबरच त्यामागील प्रचंड संशोधन खर्चामुळे तो फूल विश्वात चर्चेचा विषय ठरला. तज्ज्ञांच्या मते, ‘ज्युलिएट रोज’चे प्रत्येक फूल स्वतंत्रपणे कोट्यवधी रुपयांचे नसते. मात्र, या गुलाबाच्या जातीच्या निर्मितीसाठी लागलेला एकूण खर्च हा आजवरच्या सर्व गुलाबांमध्ये सर्वाधिक असल्याने तो ‘सर्वात महागडा गुलाब’ म्हणून ओळखला जातो. एकूणच, सौंदर्य, मेहनत, संशोधन आणि प्रतिष्ठेचेे प्रतीक ठरलेला ‘ज्युलिएट रोज’ हा गुलाब आजही फुलांच्या जगात आपले वेगळे स्थान टिकवून आहे.