Most expensive melon | जगातील सर्वात महागडे खरबूज

World’s Most Expensive Melon
World’s Most Expensive Melon | जगातील सर्वात महागडे खरबूज
Published on
Updated on

टोकियो : जपानमध्ये अनेक महागडी फळे पाहायला मिळतात. रुबी रोमन ग्रेप्स, मियाझाकी आंबे अशी ही यादी बरीच मोठी आहे. जपानमधील एक विशिष्ट खरबूजही असेच महागडे आहे, ज्याची किंमत एका आलिशान कार इतकी आहे. यूबारी किंग खरबूज नावाचे हे फळ जगातील सर्वात महागडे खरबूज आहे. हे फळ फक्त त्याच्या गोडव्याने आणि सुगंधाने नाही, तर किमतीमुळे देखील जगभरात चर्चेत आहे.

जपानच्या होक्काइडो प्रांतातील छोटं शहर युबारी येथे लागवड करण्यात येणार्‍या या खरबूजच्या एका जोडीची किंमत 5 मिलियन येन म्हणजे 29 लाख रुपये आहे. साधारण दिसणारा खरबूज इतका महाग का असेल? असा प्रश्न तुमच्या मनात देखील नक्कीच आला असेल. यूबारी किंग खरबूज हे कोणते साधारण फळ नाही, तर या फळाची शेती खास प्रकारे केली जाती. फळाचा गोडवा, आकार किंवा चव कमी होऊ नये म्हणून प्रत्येक रोपावर फक्त एकच खरबूज असते.

फळाची लागवड पूर्णपणे हरितगृह नियंत्रित प्रणालीमध्ये केली जाते जिथे तापमान, आर्द्रता आणि प्रकाश पातळी अचूकपणे राखली जाते. म्हणूनच प्रत्येक फळाचा आकार पूर्णपणे गोल असतो आणि त्याच्या सालीवर नैसर्गिक जाळीसारखी रचना असते, ज्यामुळे ते इतर खरबूजांपेक्षा वेगळे दिसते. खरबूज जपान येथे कोणाला रॉयल गिफ्ट म्हणून दिलं जातं. जपान येथे कोणाल सन्मान द्यायचा असेल तर महागडा खरबूज भेट म्हणून दिला जातो.

जपान मधील लोकांसाठी फळ सन्मानाचं प्रतीक आहे. म्हणून या फळाचा दरवर्षी लिलाव होतो आणि श्रीमंत लोकं हे फळ विकत घेण्यासाठी कोट्यवधींची रक्कम देखील मोजतात. हे खरबूज फक्त खाण्यासाठी नाही, तर एक शाही अनुभव देखील आहे. जगभरातील लोक खरबूज कमी पैशांत विकत घेतात; पण जपानमध्ये हे खरबूज घेणं म्हणजे सन्मानाची गोष्ट आहे. अनेकांनी फळाची तुलना आयफोनशी केली आहे!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news