जगातील सर्वात प्रगत ‘2 नॅनोमीटर’ चिप

2nm chip technology
जगातील सर्वात प्रगत ‘2 नॅनोमीटर’ चिपaslysun
Published on
Updated on

तैपेई ः 1 एप्रिल 2025 रोजी, तैवानच्या प्रसिद्ध चिप निर्माता कंपनी ‘टीएसएमसी’ (तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी) ने जगातील सर्वात प्रगत मायक्रोचिप ‘2 नॅनोमीटर’ (2 nm) चिप सादर केली. या चिपचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन वर्षाच्या दुसर्‍या सहामाहीत सुरू होणार असून, ही चिप संगणकीय कार्यक्षमता आणि ऊर्जा कार्यक्षमतेत मोठी झेप घेणार असल्याचे ‘टीएसएमसी’ ने जाहीर केले आहे.

मायक्रोचिप्स म्हणजे आधुनिक इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा कणा. स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, अगदी इलेक्ट्रिक टूथब—शमध्येही मायक्रोचिप्स असतात. या चिप्समध्ये बिलियनहून अधिक ट्रांझिस्टर्स असतात, जे सूक्ष्म सर्किटस्द्वारे विद्युत प्रवाह नियंत्रित करतात. जितके जास्त ट्रांझिस्टर्स, तितकी जास्त वेगवान आणि शक्तिशाली चिप, हीच या उद्योगाचा मूलमंत्र आहे. 2 पा तंत्रज्ञानाचे फायदे 3 nm चिप्सच्या तुलनेत अधिक आहेत : समान ऊर्जेवर 10% ते 15% अधिक गती, समान गतीवर 20% ते 30% ऊर्जा बचत, 15% अधिक ट्रांझिस्टर घनता, म्हणजे कमी जागेत अधिक क्षमतेची चिप. ही चिप स्मार्टफोनपासून ते कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीपर्यंत सर्वच आधुनिक उपकरणांची क्षमता लक्षणीयरीत्या वाढवू शकते. त्यामुळे ऊर्जेचा वापर कमी, गती अधिक आणि जटिल कामे अधिक सहजतेने होणार आहेत.

तैवानची मायक्रोचिप इंडस्ट्री ही केवळ आर्थिकद़ृष्ट्याच नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेच्या द़ृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यालाच ‘सिलिकॉन शील्ड’ असेही म्हणतात. कारण, तैवानची ही टेक्नोलॉजिकल ताकद अमेरिका व इतर सहयोगींना चीनच्या संभाव्य आक्रमणापासून त्याचे संरक्षण करण्यासाठी प्रवृत्त करते. ‘टीएसएमसी’ ने अमेरिकेत US 100 अब्ज (सुमारे 76 अब्ज) खर्चून पाच नवीन फॅक्टरी उभारण्याचा करार केला आहे. पण, या नव्या '2 nm' चिप्स तैवानबाहेर बनवता येणार का, याबाबत साशंकता आहे. कारण, त्यामुळे तैवानची तांत्रिक आणि सुरक्षा धारणा कमजोर होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news