world temperature record controversy | जगातील सर्वाधिक तापमानाचा विक्रम संशयाच्या भोवर्‍यात!

world temperature record controversy
world temperature record controversy | जगातील सर्वाधिक तापमानाचा विक्रम संशयाच्या भोवर्‍यात!File Photo
Published on
Updated on

लंडन : डेथ व्हॅलीने 112 वर्षांपासून पृथ्वीच्या पृष्ठभागावर मोजल्या गेलेल्या सर्वाधिक हवेच्या तापमानाचा जागतिक विक्रम आपल्या नावावर ठेवला आहे. परंतु, जुलै 1913 मध्ये नोंदवलेला हा विक्रम मानवी चुकीमुळे झाला असावा, असा संशय व्यक्त करत शास्त्रज्ञांनी तो रद्द करण्याची मागणी केली आहे. यूएस वेदर ब्युरोच्या आकडेवारीनुसार, डेथ व्हॅलीमधील ग्रीनलँड रँच येथे 10 जुलै 1913 रोजी तापमान 134 फॅरेनाईट (56.7 अंश सेल्सिअस) पर्यंत पोहोचले होते. त्यानंतर जागतिक तापमानवाढ होऊनही या प्रदेशातील तापमान फार क्वचितच 130 फॅरेनाईट (54.4 अंश सेल्सिअस ) पर्यंत पोहोचले आहे.

अलबामा विद्यापीठाचे हवामानशास्त्रज्ञ रॉय स्पेन्सर यांच्या नेतृत्वाखालील एका नवीन अभ्यासात, 1923 ते 2024 दरम्यान ग्रीनलँड रँचच्या 250 कि.मी. परिसरातील अन्य हवामान केंद्रांच्या तापमानाचे विश्लेषण करण्यात आले. उंचीनुसार डेटा समायोजित केल्यानंतर, संशोधकांना आढळले की, 10 जुलै 1913 रोजी ग्रीनलँड रँचचे तापमान प्रत्यक्षात 120 फॅरेनाईट (48.9 अंश सेल्सिअस) च्या आसपास असावे, जे 134 पेक्षा खूप कमी आहे. अभ्यासानुसार, 1913 च्या सुरुवातीच्या जुलैमध्ये मोजलेले असामान्यरीत्या उच्च तापमान आसपासच्या केंद्रांवरील तापमानाशी सुसंगत नव्हते.

1911 मध्ये स्थापित झालेले वेधशाळेचे निवारागृह सुरुवातीला सिंचन केलेल्या अ‍ॅल्फाल्फा शेताच्या काठावर होते. परंतु, रँचचा फोरमन ऑस्कर डेंटन याने अघोषितपणे ते अधिक उष्ण ठिकाणी, मोकळ्या जमिनीवर हलवले असावे, असा अभ्यासात तर्क मांडला आहे. याशिवाय, डेंटनने वेधशाळेच्या अधिकृत नोंदीऐवजी रँचच्या व्हरांड्यावरील थर्मामीटरच्या अनधिकृत नोंदी वापरल्या असाव्यात, असाही अंदाज स्पेन्सर यांनी व्यक्त केला. व्हरांड्यावरील थर्मामीटर अनेकदा खूप जास्त तापमान दाखवत असे. संशोधकांना खात्री आहे की, 134 ही नोंद चुकीची आहे आणि डब्ल्यूएमओने या प्रकरणाची पुढील तपासणी करावी, अशी मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news