color LiDAR sensors | जगातील पहिला ‘कलर लिडार’ सेन्सर लाँच

रोबो आणि स्वायत्त वाहनांना मिळणार माणसासारखी नजर
color LiDAR sensors |
color LiDAR sensors | जगातील पहिला ‘कलर लिडार’ सेन्सर लाँच
Published on
Updated on

सॅन फ्रान्सिस्को : कॅलिफोर्नियातील ‘आउस्टर’ या तंत्रज्ञान कंपनीने जगातील पहिला व्यावसायिक स्तरावर मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जाणारा ‘नेटिव्ह कलर लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग’ (Lidar) सेन्सर लाँच केला आहे. हा अत्याधुनिक सेन्सर त्रिमितीय (3 D) अवकाशीय माहिती आणि रंगीत द़ृश्ये एकाच वेळी टिपण्यास सक्षम आहे.

आतापर्यंत स्वायत्त वाहने (Autonomous Vehicles) आणि रोबोंना रंगांची आणि 3डी अंतराची माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या सेन्सर्सवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, ‘रेव्ह8’ नाव देण्यात आलेल्या या नवीन उपकरणामुळे रोबोंना त्यांच्या आजूबाजूच्या परिसराची 3डी रचना आणि रंगांची माहिती अतिशय वेगाने समजेल. परिणामी, स्वायत्त तंत्रज्ञानाच्या सुरक्षेत मोठी सुधारणा होईल, असा विश्वास आउस्टर कंपनीच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे.

कंपनीने 4 मे रोजी प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात म्हटले आहे की, ‘इतिहासात पहिल्यांदाच, एकच लिडार सेन्सर रस्त्यावरील वाहतुकीचे फलक (Road Signs) समजू शकेल, वाहनांच्या ब—ेक लाईटस्चा अंदाज घेऊ शकेल किंवा अगदी पृथ्वीवरील समृद्ध निसर्ग अचूक, रंगीत नकाशे तयार करून कॅप्चर करू शकेल. ‘आउस्टरच्या नवीन ‘रेव्ह8’ सेन्सरचे वैशिष्ट्य म्हणजे ते खोलीचा अंदाज घेण्यासाठी लेझर प्रकाश आणि रंगांची माहिती मिळवण्यासाठी आजूबाजूचा नैसर्गिक प्रकाश एकाच वेळी शोधून काढतात. या सेन्सरमध्ये बसवलेली नवीन ‘ L4 आउस्टर सिलिकॉन’ (L4 Ouster Silicon) चिप लेझरच्या साह्याने 3डी नकाशा तयार करते आणि तो बिंदू तयार होत असतानाच त्याला संबंधित रंग देखील नियुक्त करते. त्यामुळे वेगळा कॅमेरा न जोडता अत्यंत अचूक आणि रंगीत 3डी डेटा एकाच क्षणात उपलब्ध होतो.

सेन्सर कसं काम करतो?

सामान्य लिडार सेन्सर लेझरचे किरण (Laser Pulses) उत्सर्जित करतात आणि ते किरण समोरील वस्तूवरून परावर्तित होऊन परत येण्यासाठी लागणारा वेळ मोजतात. या तंत्रज्ञानामुळे आजूबाजूच्या वस्तूंचे अचूक अंतर मोजता येते आणि पृष्ठभाग किती परावर्तित (reflective) आहे, यासारखी भौतिक माहिती गोळा करता येते. या उपकरणातील एक विशेष लिडार प्रोसेसिंग चिप या परावर्तित लेझर किरणांना 3डी नकाशावरील बिंदूंमध्ये (Points) रूपांतरित करते आणि हा डेटा संगणकाकडे पाठवला जातो, ज्यामुळे वाहन किंवा रोबोटला निर्णय घेणे सोपे जाते. जर या उपकरणाला रंग देखील पाहायचे असतील, तर पूर्वी स्वतंत्र कॅमेरा लेन्सची गरज पडायची आणि त्यानंतर कॅमेर्‍याचा डेटा आणि लिडारचा डेटा एकत्र जुळवावा (Calibrate) लागायचा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news