Light Pollution Free Sky | जगातील सर्वात स्वच्छ आकाश आता प्रकाश प्रदूषणापासून राहणार मुक्त

खगोलप्रेमींचा विजय : चिलीमधील ‘मेगा प्रोजेक्ट’ रद्द
Light Pollution Free Sky
Light Pollution Free Sky | जगातील सर्वात स्वच्छ आकाश आता प्रकाश प्रदूषणापासून राहणार मुक्त
Published on
Updated on

सँटियागो : चिलीच्या अटाकामा वाळवंटातील स्वच्छ आकाश आणि तार्‍यांचे निरीक्षण करणार्‍या खगोलशास्त्रज्ञांनी मोठा सुटकेचा निःश्वास टाकला आहे. या भागात प्रस्तावित असलेला एक अब्जावधी डॉलरचा प्रकल्प अधिकृतपणे रद्द करण्यात आला असून, वैज्ञानिक समुदायाने याला ‘मोठा विजय’ म्हटले आहे. या प्रकल्पामुळे जगातील सर्वात शक्तिशाली दुर्बिणींच्या कामात अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती.

काय होता हा प्रकल्प?

‘एईएस एंडेस’ (अएड अपवशी) या कंपनीने 10 अब्ज डॉलर गुंतवणुकीचा ‘आयएनएनए’ (खछछअ) नावाचा प्रकल्प प्रस्तावित केला होता. 3,000 हेक्टरवर पसरलेल्या या प्रकल्पामध्ये ग्रीन हायड्रोजन आणि अमोनिया उत्पादन केंद्र, एक बंदर आणि तीन सौरऊर्जा प्रकल्पांचा समावेश होता.

प्रकल्पामुळे होणारे नुकसान

अटाकामा वाळवंट हे पृथ्वीवरील सर्वात कोरड्या ठिकाणांपैकी एक असून, खगोलीय पर्यटनासाठी ते नंदनवन मानले जाते. शास्त्रज्ञांच्या मते : प्रकाश प्रदूषण : या प्रकल्पामुळे होणार्‍या कृत्रिम प्रकाशामुळे रात्रीच्या वेळी आकाश स्पष्ट दिसणे कठीण झाले असते. पॅरानल वेधशाळेला धोका : युरोपियन सदर्न ऑब्झर्व्हेटरीच्या (एडज) पॅरानल वेधशाळेत असलेल्या जगातील सर्वात शक्तिशाली दुर्बिणींच्या निरीक्षणांना या प्रकल्पामुळे कधीही भरून न येणारे नुकसान पोहोचले असते.

शास्त्रज्ञांचा मोठा लढा आणि यश

2020 चे नोबेल पारितोषिक विजेते रेनहार्ड जेन्झेल यांनी चिली सरकारला पत्र लिहून हा प्रकल्प थांबवण्याची विनंती केली होती. युरोपियन सदर्न ऑब्झर्व्हेटरीच्या प्रतिनिधी इत्झियार डी ग्रेगोरियो यांनी सांगितले की, ‘हा प्रकल्प रद्द झाल्यामुळे आता वेधशाळेवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. मात्र, अशा महत्त्वाच्या ठिकाणांच्या संरक्षणासाठी आता कडक नियमांची गरज आहे.’

कंपनीची माघार

चिलीच्या पर्यावरण मूल्यांकन सेवेने पुष्टी केली आहे की, कंपनीने आपला प्रस्ताव अधिकृतपणे मागे घेतला आहे. एईएस एंडेस या कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रकल्पाच्या सविस्तर विश्लेषणानंतर आम्ही तो थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ विज्ञानासाठीच नाही, तर अटाकामाच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि खगोलीय वारसा जपण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news