World War I artillery shell | फ्रान्समध्ये तरुणाच्या शरीरात पहिल्या महायुद्धातील तोफगोळा

संपूर्ण रुग्णालय रिकामे करण्याची आली वेळ
World War I artillery shell
World War I artillery shell | फ्रान्समध्ये तरुणाच्या शरीरात पहिल्या महायुद्धातील तोफगोळा
Published on
Updated on

तुलूझ (फ्रान्स): फ्रान्समधील तुलूझ शहरात एका 24 वर्षीय तरुणाच्या कृत्यामुळे डॉक्टरांसह संपूर्ण प्रशासनाची झोप उडाली. हा तरुण गंभीर अवस्थेत रुग्णालयात पोहोचला होता; मात्र जेव्हा डॉक्टरांनी त्याची तपासणी केली, तेव्हा जे समोर आले ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या तरुणाच्या शरीरात पहिल्या महायुद्धाच्या काळातील एक ‘आर्टलिरी शेल’ (तोफेचा गोळा) अडकला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण असह्य वेदना होत असल्याने आपत्कालीन विभागात दाखल झाला होता. सुरुवातीच्या तपासणीत त्याच्या शरीरात एखादी मोठी वस्तू अडकल्याचे लक्षात आले. मात्र, शस्त्रक्रिया सुरू असताना डॉक्टरांना 8 इंच लांब तोफेचा गोळा आढळला. हा गोळा 1918 मधील म्हणजेच पहिल्या महायुद्धाच्या काळातील होता. या गोळ्याचा स्फोट होण्याची शक्यता असल्याने डॉक्टरांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केले. घटनेचे गांभीर्य ओळखून रुग्णालय प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण रुग्णालय रिकामे केले.

अग्निशमन दल आणि बॉम्ब शोधक व बॉम्ब नाशक पथकाला तातडीने बोलावण्यात आले. बॉम्ब शोधक तज्ज्ञांनी घटनास्थळी पोहोचून गोळ्याची बारकाईने तपासणी केली. तो गोळा सक्रिय आहे की नाही, हे माहीत नसल्याने काही काळ वातावरणात प्रचंड तणाव होता. अखेर, तज्ज्ञांनी हा गोळा सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आणि डॉक्टरांच्या मदतीने तो शरीराबाहेर काढला. शस्त्रक्रियेनंतर या तरुणाची प्रकृती आता स्थिर असून, तो धोक्याबाहेर आहे.

इतका जुना आणि धोकादायक गोळा शरीराच्या आत कसा पोहोचला, याचे गूढ अद्याप कायम आहे. काही फ्रेंच मीडिया रिपोर्ट्सनुसार, एखाद्या ‘पार्टी स्टंट’ दरम्यान हा प्रकार घडला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, फ्रान्सच्या कायद्यानुसार अशा प्रकारचे स्फोटक गोळे बाळगणे किंवा त्यांच्याशी छेडछाड करणे हा गंभीर गुन्हा आहे. पोलिस आता या तरुणाची चौकशी करत असून, त्याच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news