Woman Wins Ticket Jackpot | चहा प्यायला गेली, कोट्यधीश बनून आली!

Woman Wins Ticket Jackpot |
Woman Wins Ticket Jackpot | चहा प्यायला गेली, कोट्यधीश बनून आली!
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन : कुणाचे भाग्य कधी व कसे उजळेल हे काही सांगता येत नाही. अमेरिकेत एक महिला ऑफिसमध्ये असताना चहा प्यायला गेली आणि तब्बल सतरा कोटींची मालकीण होऊन आली… पण कसं?

व्हर्जिनियामध्ये राहणाऱ्या या महिलेचा तो दिवस इतर दिवसांसारखाच सामान्यपणे सुरू झाला होता. पण, त्या दिवशी ती काहीशी तणावात होती आणि कामाच्या वेळेत दुपारचे जेवण घेण्यासाठी बाहेर पडली होती. कदाचित तिलाही अंदाज नव्हता की हा छोटासा ब्रेक तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. महिला जेवण्यासाठी ‘लव फूड मार्ट’ नावाच्या दुकानात पोहोचली. तिथे तिने २० डॉलर्सचे ‘प्लॅटिनम 7s’ स्क्रॅच-ऑफ तिकीट विकत घेतलं. तिकीट खरेदी करणं तिच्यासाठी कोणतीही मोठी गोष्ट नव्हती. तिने फक्त नशीब आजमावण्यासाठी कार्ड घेतलं आणि दुकानामध्येच ते स्क्रॅच करण्यास सुरुवात केली. ‘पीपल मॅगझीन’नुसार, महिला जशीजशी तिकीट स्क्रॅच करत गेली, तशी तिला जाणीव होऊ लागली की काहीतरी मोठं घडलं आहे. शेवटी तिला समजलं की, तिकिटवर सर्वात मोठा जॅकपॉट लागला आहे. म्हणजेच तिने २ दशलक्ष डॉलर्सची लॉटरी जिंकली होती.

भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम जवळपास १७ कोटी रुपये होते. इतकी मोठी रक्कम जिंकल्यानंतर कोणत्याही माणसाच्या आनंदाला पारावार उरणार नाही. कोणी कुटुंबाला फोन करेल, कोणी मित्रांना सांगेल आणि कोणी कदाचित त्याच क्षणी नोकरीचा राजीनामा देण्याचा विचार करेल; पण या महिलेने असं काहीही केलं नाही. ती पुन्हा ऑफिसमध्ये आली आणि राहिलेलं काम करू लागली. तिने तिकीट स्वतःजवळ सुरक्षित ठेवलं आणि आपली शिफ्ट पूर्ण केली. जॅकपॉट जिंकल्यानंतर त्या महिलेकडे रक्कम घेण्यासाठी दोन पर्याय होते. पहिला पर्याय असा होता की तिला संपूर्ण बक्षिसाची रक्कम 30 वर्षांमध्ये वार्षिक हप्त्यांच्या स्वरूपात मिळाली असती. दुसरा पर्याय असा होता की ती संपूर्ण रकमेची एकरकमी कॅश पेमेंट घेऊ शकली असती, पण त्यामधील बरीच रक्कम टॅक्समध्ये जाणार होती. अशात महिलेने दुसरा पर्याय निवडला. या महिलेची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news