Woman Auto Driver | आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून महिला बनली ऑटो चालक

Woman Auto Driver |
Woman Auto Driver | आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून महिला बनली ऑटो चालक
Published on
Updated on

नवी दिल्ली : आजच्या काळात जिथे तरुण कॉर्पोरेट क्षेत्रातील लठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्यासाठी धडपडत असतात, तिथे एका महिलेने सर्वांनाच थक्क करणारा निर्णय घेतला आहे. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील प्रचंड ताणतणाव आणि न संपणार्‍या कामाच्या वेळेला कंटाळून, एका महिला अभियंत्याने थेट आयटी कंपनीतील नोकरी सोडली आणि आता ती ऑटो चालवून सन्मानाने जीवन जगत आहे. सध्या सोशल मीडियावर या महिला ऑटो चालकाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

मानसिक शांततेसाठी बदलले करिअर

सोशल मीडियावरील दाव्यानुसार, ही महिला आधी आयटी क्षेत्रात कार्यरत होती. ऑफिसमधील कामाचा अतिप्रेशर, तासन्तास चालणार्‍या मिटिंग्ज, रात्री उशिरापर्यंत काम आणि वैयक्तिक आयुष्यातील बिघडलेला ताळमेळ यामुळे ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती. या सर्व त्रासाला कंटाळून तिने अखेर कॉर्पोरेट जगताला रामराम ठोकण्याचा मोठा निर्णय घेतला. काहीतरी वेगळे आणि स्वतःच्या मर्जीने जगण्याच्या इच्छेपोटी तिने ऑटो-रिक्षा चालवण्याचा मार्ग निवडला. सुरुवातीला तिचा हा निर्णय तिच्या नातेवाईकांसाठी आणि समाजासाठी धक्कादायक होता. मात्र, तिने आपला निर्णय योग्य सिद्ध करून दाखवला. आता ती कोणाच्याही दबावाशिवाय स्वतःच्या वेळेनुसार काम करते. या कामामुळे तिला पूर्वीपेक्षा जास्त मानसिक शांतता आणि आनंद मिळत आहे. ऑटो चालवून ती दरमहा तब्बल 60,000 रुपये कमावत आहे, जे अनेक कॉर्पोरेट नोकर्‍यांच्या सुरुवातीच्या पगारापेक्षा नक्कीच जास्त आहे. सोशल मीडियावर या धाडसी महिलेच्या निर्णयाची नेटकर्‍यांकडून जोरदार प्रशंसा केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news