Magnetic Implant Body | शरीरात बसवले चुंबक!

Magnetic Implant Body
Magnetic Implant Body | शरीरात बसवले चुंबक!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अनेक दशकांपासून डॉक्टर आपल्या रुग्णांच्या शरीरात पेसमेकर, शंट सिस्टीम आणि हिप इम्प्लांटस्‌ (शस्त्रक्रियेद्वारे बसवले जाणारे कृत्रिम अवयव) बसवत आले आहेत. परंतु, कॅलिफोर्नियातील तेहाचापी येथे राहणाऱ्या एका महिलेने तिच्या शरीरात अगदी वेगळ्याच प्रकारचे इम्प्लांटस्‌ बसवून घेतले आहेत. तिच्या शरीरात एकूण ५२ इम्प्लांटस्‌ आहेत. या अनास्ताशिया सिन हिच्या नावावर शरीरात सर्वाधिक टेक्नॉलॉजिकल इम्प्लांटस्‌ असणारी महिला म्हणून जागतिक रेकॉर्ड नोंदवला गेला आहे.

अनास्ताशियाच्या इम्प्लांटस्‌मध्ये आजवर कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात बसवण्यात आलेल्या सर्वात मोठ्या चुंबकाचा समावेश आहे तसेच तिच्या कानाच्या बाहेरील भागावर आवाज प्रक्षेपित करणारे एक चुंबकीय यंत्रही बसवले गेले आहे. अनास्ताशियाच्या शरीरातील एकूण इम्प्लांटस्‌पैकी जवळपास निम्मे इम्प्लांटस्‌ हे मायक्रोचिप्स आहेत. या चिप्स ती स्वतः अशा प्रकारे प्रोग्राम करते, ज्यामुळे तिच्या संवेदना आणि क्षमता कमालीच्या वाढतात; जसे की केवळ हाताच्या स्पर्शाने कुलूप उघडणे आणि कॉम्प्युटर सुरू करणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news