Time Travel claim woman | 10 मिनिटांसाठी ‘मृत’ झालेली महिला थेट पोहोचली 2030 मध्ये!

Time Travel claim woman |
Time Travel claim woman | 10 मिनिटांसाठी ‘मृत’ झालेली महिला थेट पोहोचली 2030 मध्ये!
Published on
Updated on

मेक्सिको सिटी : मृत्यू हे जीवनाचे शेवटचे टोक आहे की दुसर्‍या जगाचे प्रवेशद्वार? मेक्सिकोमधील एका वैद्यकीय विद्यार्थिनीसोबत घडलेल्या घटनेने सध्या शास्त्रज्ञ आणि सामान्य जनता दोघांनाही बुचकळ्यात टाकले आहे. 24 वर्षांची रूबी रोल्गू हिचा दावा आहे की, जेव्हा डॉक्टरांनी तिला ‘क्लिनिकली डेड’ घोषित केले होते, तेव्हा तिचा आत्मा शांत अंधारात नाही, तर थेट 2030 सालच्या गल्ल्यांमध्ये फिरत होता.

‘मिरर यूके’च्या रिपोर्टनुसार, ही घटना गेल्यावर्षी एप्रिलमधील आहे. 24 वर्षीय रूबीला फुफ्फुसात रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती इतकी खालावली की, तिला हृदयविकाराचा झटका आला आणि तब्बल 10 मिनिटांसाठी तिची धडधड थांबली. डॉक्टरांनी तिच्या कुटुंबाला सांगितले होते की, रूबीचा मेंदू मृत झाला असून, ती पुन्हा शुद्धीवर येण्याची आशा अत्यंत कमी आहे. मात्र, 10 मिनिटांनंतर ती चमत्कारिकरीत्या शुद्धीवर आली. शुद्धीवर आल्यानंतर रूबीने जे सांगितले ते एखाद्या सायन्स-फिक्शन चित्रपटासारखे वाटते. रूबी म्हणाली की, त्या 10 मिनिटांत तिने पुढची 5 वर्षे दिवसेंदिवस आपल्या डोळ्यांसमोर जगताना पाहिली. तिच्या दाव्यानुसार, 2030 सालचे जग आजच्या धावपळीच्या तुलनेत अधिक शांत आणि शिस्तबद्ध असेल. लोक आजच्याप्रमाणे स्मार्टफोनचे गुलाम नसतील.

ऑटोमेशन आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे मानवी कामे सोपी होतील, ज्यामुळे लोक कुटुंब आणि समाजाला जास्त वेळ देऊ शकतील. तिने स्वतःला आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना वयस्कर होताना पाहिले. भविष्यातील जग हे तंत्रज्ञान आणि मानवी संवेदनांचा एक अद्भुत मेळ असेल. सामान्यतः, लोक मृत्यूच्या नावाने घाबरतात; पण रूबीचा अनुभव याच्या उलट होता. तिने सांगितले की, भविष्यातील ते जग इतके सुखद आणि शांत होते की, जेव्हा तिचे डोळे पुन्हा 2025 सालच्या (वर्तमान) रुग्णालयात उघडले, तेव्हा तिला खूप दुःख झाले. रूबी म्हणाली, ‘मला एक प्रकाशाचा बोगदा दिसला आणि अचानक मी माझ्या बेडवर होते. शुद्धीवर आल्यावर जेव्हा मी माझ्या भावाला पाहिले, तेव्हा मी चक्रावून गेले; कारण 2030 च्या माझ्या आठवणींच्या तुलनेत तो खूपच लहान दिसत होता.’ रूबीच्या मते, भविष्यातील ती शांतता इतकी खोल होती की, या गोंगाटाच्या जगात परतणे तिला नरकासारखे वाटले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news