

नवी दिल्ली ः उत्तम आरोग्य हवे असल्यास आहाराकडे सर्वाधिक लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. आरोग्यतज्ज्ञ सर्व लोकांना आहारात पुरेसे पोषक घटक असलेल्या पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. अभ्यासातून हे देखील दिसून आले आहे की, जर आपण आपल्या आहारात सुधारणा केली, तर अनेक प्रकारच्या जुनाट (क्रॉनिक) आजारांचा धोका कमी करता येतो. तुम्हाला आहारात शरीरासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक मिळत आहेत का? यासंदर्भातील आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.
भारतात व्हिटॅमिन-डी ची कमतरता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही समस्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांमध्ये दिसून येत आहे. हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे कमी वयातच लोकांना हाडांमध्ये वेदना होणे, संधिवात (आर्थरायटिस) यांसारख्या समस्यांना सामोसे जावे लागत आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतासारख्या देशात, जिथे प्रत्येक ऋतूमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश उपलब्ध असतो, तिथेही देशातील सुमारे 70-80% लोकसंख्येमध्ये व्हिटॅमिन-डी ची कमतरता असणे खूप चिंताजनक आहे. जर वेळीच यात सुधारणा केली गेली नाही, तर येणाऱ्या दशकांमध्ये देशातील मोठ्या लोकसंख्येला संधिवात, रोगप्रतिकारशक्तीची कमजोरी यासह अनेक प्रकारच्या आजारांचा धोका होऊ शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार ( थकज), साधारणपणे 30-50 नॅनोग््रााम/मिलीलीटरची पातळी सामान्य मानली जाते. मात्र, भारतात ही पातळी सरासरी नॅनोग््रााम/मिलीलीटरपर्यंत दिसून येत आहे. आरोग्यतज्ज्ञ सांगतात की, शहरी जीवनशैली, घरे आणि कार्यालयांमध्ये जास्त वेळ घालवणे, सनस्क्रीनचा अतिवापर आणि पोषणाची कमतरता ही याची प्रमुख कारणे आहेत. बहुतेक लोक दिवसभर कार्यालयात राहिल्यामुळे त्यांचा सूर्यप्रकाशाशी संपर्क होत नाही, जो या जीवनसत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दररोज हलका सूर्यप्रकाश घेणे, प्रथिनयुक्त आहारासोबत व्हिटॅमिन-डी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. व्हिटॅमिन-डी शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरसचा समतोल राखण्यासाठी आवश्यक आहे, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात. याव्यतिरिक्त, ते रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी आणि मेंदूच्या तसेच मानसिक आरोग्यासाठी देखील आवश्यक आहे. या पोषक तत्त्वाच्या कमतरतेमुळे संपूर्ण आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
व्हिटॅमिन डी चे मुख्य कार्य म्हणजे शरीरात कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करणे. त्याच्या कमतरतेमुळे शरीरात कॅल्शियमचा योग्य वापर होऊ शकत नाही, ज्यामुळे हाडे कमकुवत होऊ लागतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या अहवालानुसार, भारतातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त महिला आणि वृद्धांमध्ये ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडे कमकुवत होण्याची समस्या दिसून येते, ज्याचे मुख्य कारण व्हिटॅमिन-डी ची कमतरता असू शकते.