

टोकियो : या जगात अनेक देशांचे आपापले चलन आहे. प्रत्येक देशाचे आपापले नाणेदेखील आहे. परंतु, या जगात असा एक देश आहे, ज्या देशाचे नाणे पाण्यावर ठेवले, तर ते बुडत नाही. उलट ते नाणे पाण्यावर तरंगते. हे नाणे कोणते आहे? ते का तरंगते याबाबत जाणून घेऊ या...
हे नाणे जपान या देशाचे आहे. या नाण्याला ‘येन’ असे म्हणतात. जपानचे येन हे नाणे सहजासहजी पाण्यात बुडत नाही. पाण्यावर ठेवल्यावर ते तरंगते. खूपच जोर लावल्यावर मात्र ते पाण्यात बुडते. परंतु, या नाण्याच्या अशा खास गुणधर्मामुळे ते कायम चर्चेत असते. जपानमध्ये हे नाणे अजूनही चलनात आहे. ते पाण्यात न बुडण्यामागे विज्ञान आहे. जपानचे 1 येन हे नाणे फक्त 0.9992 ग्रॅम एवढ्या वजनाचे असते. म्हणजे या नाण्याचे वजन एक ग्रॅमदेखील नसते. या नाण्याचा व्यास 20.00 मि.मी. असतो.
तर जाडी 1.46 मि.मी. असते. हे नाणे खूपच हलके असते त्यामुळे ते पाण्यावर ठेवल्यास तरंगते. विशेष म्हणजे, हे नाणे अॅल्युमिनिअमपासून तयार केले जाते. अॅल्युमिनिअम हा हलका धातू असतो. 1870 च्या काळात जपानमध्ये 1 येनचे नाणे तयार करताना चांदी, सोने वापरले जायचे. आता मात्र ही पद्धत बंद पडली आहे. जपानमध्ये एकूण 6 प्रकारचे वेगवेगळे नाणे चलनात आहेत. यामध्ये 1 येन, पाच येन, दहा येन, 50 येन, 500 येन अशी नाणे तिथे आहेत. 1 आणि 5 येन हे नाणे तिथे वेंडिंग मशिमध्ये वापरता येत नाही. बाकी उर्वरित दैनंदिन कामासाठी या नाण्यांचा तुम्ही चलन म्हणून वापर करू शकता.