Heart Cancer | हृदयाचा कर्करोग इतका दुर्मीळ का?

शास्त्रज्ञांनी शोधले त्यामागचे रंजक कारण
Heart Cancer |
Heart Cancer | हृदयाचा कर्करोग इतका दुर्मीळ का?nikhil.pawar3795
Published on
Updated on

लंडन : जगभरात विविध प्रकारच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना, हृदयाच्या कर्करोगाबद्दल मात्र फारसे ऐकायला मिळत नाही. वैद्यकीय विज्ञानात हृदयाचा कर्करोग होणे अत्यंत दुर्मीळ मानले जाते; पण असे का? यामागील गूढ आता एका नवीन संशोधनातून उघड झाले आहे.

संशोधनानुसार, आपल्या हृदयाचे सतत धडधडणे हीच क्रिया त्याला कर्करोगापासून वाचवते. हृदयाच्या सततच्या आकुंचन-प्रसरणामुळे जो ‘मेकॅनिकल लोड’ (यांत्रिक दाब) निर्माण होतो, तो कर्करोगाच्या पेशींना वाढण्यापासून रोखतो. हृदयाला शरीरात रक्त पंप करण्यासाठी सतत प्रचंड दाब आणि प्रतिकाराचा सामना करावा लागतो. या प्रक्रियेमुळे हृदयाच्या ऊतींवर तीव्र यांत्रिक ताण येतो. या कठीण कामामुळे प्रौढ व्यक्तीच्या हृदयातील पेशी स्वतःला नवीन करण्याची क्षमता खूप कमी असते. वर्षाकाठी केवळ एक टक्काच हृदयपेशी नवीन तयार होतात. हा यांत्रिक ताण केवळ सामान्य पेशींची वाढ मर्यादित करत नाही, तर तो कर्करोगाच्या पेशींच्या वाढीची यंत्रणा (जीन रेग्युलेशन) देखील पूर्णपणे रोखून धरतो.

हे रहस्य अधिक सखोलपणे समजून घेण्यासाठी संशोधकांनी उंदरांवर एक विशेष प्रयोग केला. त्यांनी एक ‘ट्रान्सप्लांट मॉडेल’ विकसित केले, ज्यामध्ये हृदयावर पडणारा हा यांत्रिक भार कमी करता येईल, अशी सोय होती. या प्रयोगातून असे दिसून आले की, जोपर्यंत हृदयावर यांत्रिक दाब असतो, तोपर्यंत विविध प्रकारच्या कर्करोगांची वाढ रोखली जाते. मात्र, हा दाब कमी होताच कर्करोगांचा धोका वाढू शकतो. हा निष्कर्ष केवळ हृदयाच्या सुरक्षिततेवर प्रकाश टाकत नाही, तर कर्करोगाच्या उपचारांसाठी एक नवी दिशा दाखवतो. भविष्यात ‘मेकॅनिकल स्टिम्युलेशन’ (यांत्रिक उत्तेजना) वर आधारित नवीन आणि प्रभावी कर्करोग उपचार पद्धती विकसित होण्याची शक्यता या संशोधनाने निर्माण केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news