ऑक्टोबर हीट संपून नोव्हेंबर महिना सध्या सुरू आहे. अशात थंडीला सुरुवातही झालीय. तसं पाहायला गेलं तर अनेकांना हिवाळा ऋतू आवडतो; मात्र हिवाळा जितका चांगला असतो, तितकाच तो अनेक आजारही घेऊन येतो. सर्दी-खोकला हे सामान्य आजार आहेत. परंतु, विशेष म्हणजे हृदयरोगींनाही हिवाळ्यात काळजी घ्यावी लागते; अन्यथा त्यांची प्रकृती बिघडू शकते. हे का घडते? यापासून बचाव करण्याचे उपाय काय आहेत? जाणून घेऊया.
रक्तवाहिन्या गोठणे : आरोग्यतज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात हृदयाच्या नसांमध्ये रक्त गोठण्यास सुरुवात होते. त्याच्या संचयामुळे, हृदयविकाराचे अनेक आजार आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.
कोरोनरी हार्ट डिसीज : कोरोनरी डिसीजमध्ये छातीत दुखण्याची समस्या सामान्य आहे, जी हिवाळ्याच्या ऋतूमध्ये वाढते.
तापमान असंतुलन : हिवाळ्यात आपले हृदय सामान्य तापमान संतुलित करू शकत नाही. वारंवार तापमानाच्या असंतुलनामुळे हृदयाच्या स्नायूंना नुकसान होते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
हिवाळा सुरू झाला आहे. सध्या सकाळ-संध्याकाळ थंडी असते. हृदयाच्या रुग्णांनी असंच निश्चिंत राहू नये आणि उबदार कपडे घालावेत.
हृदयाच्या रुग्णांनी शक्य तितके कमी बाहेर जावे. विशेषत:, जेव्हा थंड वारे वाहू लागतात.
अल्कोहोलचे सेवन कमी करावे. यामुळे शरीरातील तापमान गरम होईल; पण बाहेरून थंड वारे वाहत असल्याने तापमान वर-खाली होऊ शकते.
हाताची स्वच्छता राखा. याच्या मदतीने तुम्ही संसर्ग टाळू शकता.
जर आधीच बीपी किंवा कोलेस्ट्रॉलची समस्या असेल, तर एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.