Animal Pupil Shapes | प्राण्यांच्या डोळ्यांतील बाहुल्यांचा आकार वेगळा का असतो?

Animal Pupil Shapes |
Animal Pupil Shapes | प्राण्यांच्या डोळ्यांतील बाहुल्यांचा आकार वेगळा का असतो?
Published on
Updated on

लंडन : प्राण्यांच्या डोळ्यांतील बाहुल्या केवळ प्रकाशात आकुंचन पावतात आणि अंधारात रुंदावतात, असे आपल्याला वाटते. मात्र, निसर्गात डोळ्यांच्या बाहुल्यांचे विविध आकार, जसे की मांजरींमधील उभ्या भेगा, शेळ्या-घोड्यांमधील आडवे आयत आणि कटलफिशमधील ‘W’ आकार, त्या प्राण्याच्या जगण्याच्या पद्धतीबद्दल बरेच काही सांगून जातात.

एका आदर्श ऑप्टिकल प्रणालीमध्ये बाहुलीचा आकार फारसा महत्त्वाचा नसतो, असे न्यूकॅसल युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञ जेनी रीड सांगतात. परंतु, वास्तव जगातील डोळे परिपूर्ण नसतात. बाहुलीतून येणारा प्रकाश जेव्हा डोळ्यांत शिरतो, तेव्हा त्याचे विवर्तन आणि डिफोकस होते. बाहुलीचा विशिष्ट आकार या दोषांचे निराकरण करून प्राण्याला स्पष्ट दिसण्यास मदत करतो. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले येथील प्रोफेसर मार्टी बँक्स यांनी 2015 मध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार, बाहुलीचा आकार आणि तिची दिशा प्राण्याच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाची असते. कॅमेरा लेन्सप्रमाणेच, डोळ्यांची बाहुली ‘डेप्थ ऑफ फील्ड’ नियंत्रित करते.

उभ्या बाहुल्या (डश्रळीं र्झीळिश्री) : मांजरी आणि सापांसारखे दबा धरून शिकार करणारे प्राणी अंतराचा अंदाज घेण्यासाठी ‘स्टिरिओप्सिस’ प्रक्रियेचा वापर करतात. त्यांचे डोळे शेजारी-शेजारी असल्याने त्यांना उभ्या कडा (तशीींळलरश्र शवसशी) अधिक स्पष्ट दिसणे आवश्यक असते. तंत्र : जेव्हा बाहुली आडव्या बाजूने अरुंद आणि उभ्या बाजूने रुंद असते, तेव्हा ती ‘स्टिरिओप्सिस’साठी आवश्यक असलेली स्पष्टता प्रदान करते. त्याच वेळी, उभ्या विस्तारामुळे ते ‘ब्लर’ (धूसरपणा) तंत्राचा वापर करून अंतराचा अचूक अंदाज लावू शकतात. हे तंत्र प्रामुख्याने जमिनीलगत राहणार्‍या लहान शिकारी प्राण्यांसाठी (उदा. घरगुती मांजर) जास्त प्रभावी ठरते. याउलट, सिंह किंवा वाघांसारख्या मोठ्या शिकारी प्राण्यांच्या बाहुल्या गोल असतात. याचे कारण असे की, ते उंचावरून जमिनीकडे पाहतात, जिथे अंतराचा अंदाज घेण्यासाठी ‘ब्लर’ तंत्राचा फायदा कमी होतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news