तब्बल 5.9 फुटांचा दुधी भोपळा!

whopping 5.9 feet long milk gourd
तब्बल 5.9 फुटांचा दुधी भोपळा!File Photo
Published on
Updated on

भोपाळ : मोठ्या आकाराच्या फळांची किंवा भाज्यांची नेहमीच चर्चा होत असते. जगाच्या पाठीवर अशा काही भाज्यांनी विश्वविक्रमही केलेले आहेत. आपल्या देशातही अधूनमधून असामान्य आकाराच्या अशा फळभाज्या किंवा भाज्यांची उदाहरणे समोर येत असतात. आता मध्य प्रदेशातील मुरैना येथील अन्नुसिंह चौहान नावाच्या शेतकर्‍याच्या शेतात तब्बल 5.9 फूट लांबीचा दुधी भोपळा लागला आहे. ही दुधी खुद्द शेतकर्‍यापेक्षाही अधिक लांबीची आहे. या शेतकर्‍याची उंची 5 फूट 6 इंच आहे. याचा अर्थहा दुधी भोपळा त्याच्यापेक्षा तीन इंच अधिक लांबीचा आहे.

मुरैनाच्या धरमगढ गावातील या शेतकर्‍याचा दुधी भोपळा पाहण्यासाठी लोक गर्दी करीत आहेत. त्याच्या शेतातील या दुधीविषयी अनेक लोकांना कुतूहल आहे, पण अन्नूसिंह यांनी त्याचे बीज कुठून आणले, कशी मशागत केली वगैरे माहिती कुणालाही दिलेली नाही! काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीमध्येही अशी मोठी दुधी समोर आली होती. तिथे 5 फूट 6 इंच लांबीची दुधी दिसून आली. एका नर्सरीचे संचालक दविंदर पाल सिंह यांनी सांगितले की, त्यांनी सुमारे दोन महिन्यांपूर्वी या दुधीची वेल लावली होती. आता या वेलीला 5 फूट 6 इंचांपेक्षाही अधिक लांबीचा हा दुधी भोपळा लागला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news