नवी दिल्ली : सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे गरजेचे बनलेले आहे. त्यासाठी अर्थातच आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. तज्ज्ञांनी म्हटले आहे की सफेद कांद्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होते. आरोग्यासाठी अनेक प्रकारे या पांढर्या कांद्याचा लाभ होत असतो.
कांद्याने कोणत्याही भाजीचा स्वाद वाढतो. कच्चा कांदाही आवडीने खाल्ला जातो. केवळ स्वादासाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही कांद्याचे सेवन उपयुक्त आहे. विशेषतः सफेद कांद्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेट्री, अँटी-अॅलर्जिक, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुण मोठ्या प्रमाणात असतात. शिवाय 'अ','बी-6' जीवनसत्त्वे, बी-कॉम्प्लेक्स, लोह, फोलेट आणि पोटॅशियमही सफेद कांद्यात अधिक असते. सफेद कांद्यातील सेलेनियम शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवते. सेलेनियम हे व्हायरल आणि अॅलर्जीच्या 'मॅनेजमेंट'मध्येही महत्त्वाची भूमिका बजावते. पांढरा कांदा हा फायबर आणि प्रोबायोटिक्सचा एक चांगला स्रोत असतो. त्यामुळे पचनसंस्था, पोटाचे आरोग्य चांगले राहते. पोटातील आरोग्यदायी जीवाणूंची संख्याही वाढते.