

नवी दिल्ली : केस पांढरे होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि प्रत्येक व्यक्तीचे केस वृद्धत्वात पांढरे होऊ शकतात. परंतु, लहान वयात आणि वेळेपूर्वी केस पांढरे होऊ लागतात, तेव्हा ही चिंतेची बाब ठरू शकते. केस अकाली पांढरे होणे किंवा प्री-मॅच्युअर ग्रे होणे यामुळे अनेक लोक त्रस्त होतात. आज 40 ते 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांचे केसही पांढरे होत आहेत. केस अकाली पांढरे होण्याची समस्या महाविद्यालयीन मुलांमध्येही दिसून येत आहे. याची अनेक कारणे असू शकतात, जसे की आनुवंशिकता, तणाव आणि पोषणाची कमतरता. शरीरातील विविध प्रकारच्या पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे केसांशी संबंधित या समस्या उद्भवू शकतात. शरीरात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता हे देखील कमी वयात केस पांढरे होण्याच्या समस्येचे एक प्रमुख कारण असू शकते, असे तज्ज्ञ सांगतात.
व्हिटॅमिन बी 12 चा योग्य डोस, जो संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहे, तुमच्या केसांसाठी देखील खूप महत्त्वाचा आहे. हे केवळ प्रौढांसाठीच नाही तर मुलांसाठी देखील आवश्यक पोषक आहे. जेव्हा शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची पातळी कमी होते तेव्हा केसांशी संबंधित काही समस्या वाढतात. व्हिटॅमिन बी 12 चे मुख्य कार्य म्हणजे लाल रक्तपेशींद्वारे शरीराच्या प्रत्येक भागात ऑक्सिजन पोहोचवणे हे आहे. जेव्हा व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता उद्भवते तेव्हा ऑक्सिजन केसांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे केसांच्या पेशी कमकुवत होऊ लागतात. कमकुवत पेशी मेलेनिन तयार करू शकत नाहीत ज्यामुळे केसांना काळा रंग येतो आणि त्यामुळे तुमचे काळे केस हळूहळू पांढरे होऊ लागतात आणि केसांचा रंग लहान वयातच पांढरा दिसू लागतो. शरीरासाठी आणि केसांसाठी आवश्यक असलेल्या व्हिटॅमिन बी 12 चा योग्य डोस मिळविण्यासाठी, तुम्ही या पदार्थांचे सेवन करू शकता- दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ, अंडी, तृणधान्ये खाल्ल्यानेदेखील व्हिटॅमिन बी 12 मिळते.सॅल्मन आणि ट्यूना सारखे फ्रटस्युक्त मासे, राजमा, मसूर आणि मटार सारख्या बीन्समुळेही व्हिटॅमिन बी 12 मिळते. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे केसांचा दाटसरपणा कमी होऊ लागतो. वास्तविक, व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे, केसांचे कूप नवीन केस वाढण्यास मदत करू शकत नाहीत, त्यामुळे केस गळणे आणि डोक्यावर पॅच दिसू लागतात. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे केस कोरडे आणि कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे ते तुटणे आणि सहज गळून पडणे सुरू होते.