

लंडन : ‘सौंदर्य हे पाहणार्याच्या द़ृष्टिकोनात असते’ असे म्हटले जात असले, तरी जागतिक पातळीवर सौंदर्याचे मोजमाप आणि विश्लेषण करण्यासाठी तज्ज्ञ विविध निकषांचा वापर करतात. नुकत्याच समोर आलेल्या एका जागतिक सर्वेक्षणाच्या क्रमवारीत जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत ‘तुर्की’ या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेल्या या सर्वेक्षणात जगातील ‘टॉप 20’ देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
‘वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू’द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चिल्या गेलेल्या या यादीत विविध देशांच्या सौंदर्याच्या मानकांचा आढावा घेण्यात आला आहे. या यादीत दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला दुसर्या, तर ब—ाझील तिसर्या क्रमांकावर आहे. भारत, कोलंबिया, लेबनॉन, स्वीडन आणि डेन्मार्क या देशांमध्येही सुंदर महिला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भारताला जागतिक सौंदर्य स्पर्धांचा मोठा इतिहास लाभला आहे.
भारताने आतापर्यंत अनेक वेळा ‘मिस वर्ल्ड’ आणि ‘मिस युनिव्हर्स’चे मुकुट पटकावले आहेत. सोफिया व्हर्गारा आणि कॅटालिना सँडिनो मोरेनो यांसारख्या कोलंबियन अभिनेत्रींनी त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने जागतिक स्तरावर छाप पाडली आहे. अर्थात, आशियाचा विचार करता याबाबत पाकिस्तान प्रथम क्रमांकावर आहे. ‘साऊथ एशिया इंडेक्स’सारख्या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय सूचींमध्ये पाकिस्तानला आशियातील सर्वात सुंदर आणि आकर्षक महिलांच्या यादीत अव्वल स्थान देण्यात आले आहे.