Universe boundary theory | कुठंय ब्रह्मांडाची सीमारेषा?

Universe boundary theory |
Universe boundary theory | कुठंय ब्रह्मांडाची सीमारेषा?
Published on
Updated on

लंडन : अंतराळ, ग्रह, तारे आणि मिल्की वे आकाशगंगा याबाबतचे अनेक खुलासे करणार्‍या अंतराळ संशोधकांनी नुकताच नवा उलगडा केला आहे. संशोधकांच्या दाव्यानुसार त्यांना या आकाशगंगेचा अंत नेमका कुठं होतो, या प्रश्नाचं उत्तर गवसलं आहे. सजीवसृष्टी ज्या आकाशगंगेत आहे, तिचा शेवट कुठं होतो, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न, ज्याचं उत्तर प्रचंड मेहनतीनं मिळवण्यात आलं आहे.

सायन्स अलर्टच्या एका अहवालानुसार मिल्की वे, या आपल्या आकाशगंगेची अंतिम सीमा निर्धारित करणं अतिशय कठीण असून, आकाशगंगा केंद्रापासून जितकी दूर दाते, तितकीच तिची घनता कमी होत जाते. माल्टा विद्यापीठातील संशोधकांच्या एका संशोधनपर अहवालानुसार त्यांना याच आकाशगंगेचं शेवटचं टोक सापडलं आहे. ‘अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’मधील माहितीनुसार जिथं तार्‍यांचा जन्म होतो ते आकाशगंगेतील ठिकाण केंद्रापासून 11.28 आणि 12.15 किलोपारसेक म्हणजेच साधारण 40000 प्रकाशवर्ष इतक्या अंतरावर असल्याचं सांगण्यात येतं.

अतिशय महत्त्वाच्या आणि तितक्याच आव्हानात्मक अशा या संशोधनामध्ये 100,000 हून अधिक विशाल तार्‍यांचं विश्लेषण करण्यात आलं. ज्यामध्ये उपलब्ध माहितीतून आकाशगंगेतील तार्‍यांची स्थिती आणि विकासासह त्यांच्या वयाबाबतसुद्धा माहिती मिळाली. आकाशगंगेच्या केंद्रानजीक असणारे तारे अतिशय जुने असून, एका निश्चित बिंदूपर्यंत ते हळूहळू कमी होत चालले आहेत. आकाशगंगेच्या अगदी किनार्‍यापाशी किंवा त्याहीपलिकडे काही असे तारे आहेत, ज्यांची निर्मिती आकाशगंगेत झाली; मात्र काही कारणास्तव ते सीमेबाहेर ढकलले गेले.

सदर अहवालाच्या लेखकांनुसार तोच निश्चित बिंदू आकाशगंगेचा शेवट असू शकतो. ब्रह्मांड म्हणजे अस्तित्वात असलेली सर्व भौतिक द्रव्ये, ऊर्जा, आकाशगंगा, तारे, ग्रह, अवकाश यांचा पसारा. पृथ्वी, सूर्यमाला आणि अब्जावधी आकाशगंगा या ब्रह्मांडाचा भाग आहेत. साधारण 13.8 अब्ज वर्षांपूर्वी ‘बिग बँग’ या महास्फोटातून याची निर्मिती झाली आणि ते अजूनही आपली व्याप्ती वाढवत आहे, असं म्हटलं जातं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news